विद्यालयात जमनलाल बजाज यांची जयंती साजरी.
स्थानिक, प्रतापनगर, वर्धा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात प्रसिद्ध उद्योगपती, थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक लाखो लोकांना उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणारे आमचे श्रद्धास्थान स्वर्गीय जमनालालजी बजाज याची जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली. विद्यालयात विराजमान असलेल्या पुतळ्याला जेष्ठ शिक्षक पुंडलिक नागतोडे , प्रमुख अतिथी मंगेश गिरडे यांनी माल्यार्पण केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तन मन धनाने झटणारे महान व्यक्तिमत्व, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सेवाग्रामला आणून भारतीय स्वातंत्र्यचळवळ संपूर्ण जनामनात पोहचवली. देशाचा विकास, तरुणांना रोजगार यासाठी देशात बजाज उद्योग समूहाची निर्मिती, वर्धा, नागपूर येथे मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून विज्ञान, वाणिज्य, कृषी व तंत्रज्ञान शिक्षणाची उभारणी केली. आजही बजाज उद्योग समूह सी. एस. आर. फंडातून ग्रामीण भागात शिक्षण, शेती सिंचन सुविधा, जलसंधारण व जळव्यवस्थापन सबधी कामे करत आहे. अशी माहिती पुंडलिक नागतोडे यांनी विध्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमला अध्यापिका दीपाली मालपे, अश्विनी कानडे, वंदना मारगये, वैशाली चिवाने, अध्यापक संतोष सटोटे, प्रल्हाद बिडकर, मिलिंद सरोदे, विनोद बोंबले, विलास खोडके याची उपस्थिती होती व सहकार्य केले कार्यक्रम नियोजन व संचालन दीपाली मालपे यांनी केले तर आभार अश्विनी कानडे यांनी मानले. विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
सहासिक न्यूज -24 वर्धा