विधानसभा मतदार क्षेत्राची यादी प्रसिद्ध, मतदारांना नोंदणी किंवा आक्षेपांची संधी
देवळी विधानसभा मतदारसंघाची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली असून सदर यादीमध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आलेली आहे.तसेच सदर यादी भागांमध्ये १जानेवारी २४ नुसार विषय संक्षिप्त पुनर निरीक्षण कार्यक्रम देवळी विधानसभा मध्ये राबविण्यात आला असून ३३१ यादी भागांमध्ये १ जानेवारी २४ च्या अहर्ता दिनांकावर प्रारूप मतदान याद्या तयार करण्यात आल्या असून सदर याद्यावर मतदान नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी,भूसंपादन सामान्य,तहसील कार्यालय देवळी,पंचायत समिती देवळी, नगरपरिषद देवळी,व पुलगाव कार्यालयात सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी नोटीस बोर्डवर नमुना ५ व नमुना ६ नुसार लावून एकूण ३३१यादी भाग २७ ऑक्टोंबर २३ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहे.तसेच मतदार याद्यांमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत दावा किंवा एखादी नाव समाविष्ट करायचे असल्यास अथवा एखादी नोंदणीच्या तपशीला बाबद आक्षेप असल्यास असे दावे ९ डिसेंबर २३ रोजी किंवा पर्यंत तथास्थितीत नमुना ६,७,८, मध्ये दाखल करून स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार देवळी यांच्याकडे सदर प्रकरणे दाखल करावे असे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ एस आर पाराजे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज-24 देवळी