विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहीनीचे पोलिस अधिक्षक यांना निवेदन
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
अवघा काही दिवसांवर नवरात्री उत्सव येवून ठेपला आहे. वर्धा शहरात हा ऊत्सव अतिशय भव्य प्रमाणात साजरा केला जातो . त्या निमित्य विविध सजावट , महाप्रसाद वितरण , रोषनाई , आदी दुर्गा मंडळाद्वारा आयोजन केले जाते . मातेच्या दर्शनासाठी व ऊत्सवाचा आनंद घेण्यासाठी शहरातील तसेच अवतीभवतीच्या ग्रामिण भागातून बहुसंख्येने स्त्रीया , तरूण मूली , पुरुष , बालके हे शहरात येत असतात . होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून समाजातील समाजकंटक , चोर , चिडीमार करणारे यांच्या मुळे स्त्रीयांना व तरूण मूलींना विनाकारण त्रास सहन करावा लागतो . जसे , गर्दीतून वेगाने वाहन नेणे , गळ्यातील दागिने , पर्स , पाकिट , टाँटींग , असांसदीय व असभ्य शब्दांचा प्रयोग तसेच असभ्य वर्तन आदी विविध प्रकारच्या त्रास त्यांना सहन करावे लागते . या संदर्भात दुर्गा उत्सव समाप्त होई पर्यंत शहरात चोख बंदोबस्त ठेवून अश्या अपद्रवी समाजकंटकांपासून महीला आणि वृद्धांना सुरक्षितता प्रदान करावी . या कार्याकरीता आमच्या सहकार्याची आवश्यकता असल्यास आमच्या संघटना व संस्थेद्वारा महीला व पुरुष सदस्य आपणांस सहकार्य करावयास तयार आहोत . या उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये या करीताच निवेदन देण्यात आले.यावेळी पल्लवी राऊत दुर्गा वाहिनी जिल्हा संयोजिका, अनुराधा महाकाळकर मातृशक्ती नगर संयोजिका, रश्मी राजपूत बाल संस्कार नगर संयोजिका, सुरेखाताई कावळे सत्संग सहसंयोजिका, गीता पटेल सत्संग संयोजिका, पुनम भोयर, जानवी बावणे, प्रतीक्षा कुसरे व मातृ शक्ती व दुर्गावाहिनी कार्यकर्ता उपस्थित होत्या.