विहिरिवर पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
प्रतिनिधी/ वर्धा:
आर्वी येथे विहिरीवर पोहायला गेलेल्या दोन 15 वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निंबोळी शिवारात दोघांचेही मृतदेह एका शेतातील विहिरीत आढळून आले आहेय. सायकलने पोहायला गेलेल्या दोघांचेही मृतदेह विहिरीत सापडल्याने खडबळ निर्माण झाली आहेय.
आर्वी येथील साई नगर मधील युगंधर धर्मपाल मानकर आणि देवांशु घोडमारे 15 वर्षीय मुलं घरून सायकलने बाहेर पडले होते. निंबोळी शिवारात राजू गुलहाने यांच्या शेतातील विहिरीत पोहायला गेले. दोराच्या सहाय्याने पोहत असताना अचानक दोर तुटला आणि विहिरीत खाली बुडाले. दोघेही शनिवारी सायंकाळ पासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी त्यांचा बराच शोध घेतला पण सापडून आले नव्हते. त्यामुळे पोलिसात धाव घेतली. आर्वी येथील दोन 14 ते 15 वर्षाची मुले रात्री घरी न परतल्याने कुटुंबीयांनी आर्वी पोलिसात तक्रार दिली होती. त्यांचा शोध सुरू असताना सकाळी नेरी पुनर्वसन परिसरातील विहिरीत दोघांचे मृतदेह दिसून आले आहे.