शासनाच्या आदेशाने सेवानिवृत्त कर्चाऱ्यांचे सभासदत्व रद्द, ठेवी व शेअर्स परत करा,, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी.
वर्धा येथे सहाय्यक निबंधक कार्यालयात कारंजा येथील कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दि,3 शुक्रवार ला एकत्र येत शासन निर्णयातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळावा म्हणून दोन तास ठिय्या आंदोलन केले, अखेर तोडगा काढण्याचे तात्पुरते आश्वासन मिळाल्याने पुढील सूनावणीपर्यंत ते मागे घेण्यात आले आहे, जिल्ह्यातील वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता गेल्या महिन्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सभासदत्व व मतदानाचा अधिकार दि, 10 फेब्रुवारी 2023 च्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या शासननिर्णयानुसार रद्द केला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील 69 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदविला , त्यानुसार दि,3 शुक्रवार ला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा तालुका सहकारी निवडनुक निर्णय अधिकारी यांनी संबंधितांना आपल्या कार्यालयात सुनावणी करीता पाचारण केले होते, यावेळी कर्मचाऱ्यांनी आमची संस्थेकडे जमा असलेली शेअर्स व ठेवीची रक्कम परत करावी जर संस्थेला शक्य नसेल तर ती शासनाने परत करावी, व नंतरच आमचे सभासदत्व रद्द करून आमचा मतदानाचा अधिकार काढावा ही मागणी रेटून धरली, पण यावर कोणताही समाधानकारक तोडगा निघू शकला नाही,त्याकरिता कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच दोन तास ठिय्या दिला, अखेर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुन्हा दि,6 सोमवार ला याबाबत सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी तूर्तास त्यांचा आंदोलनात्मक पवित्रा मागे घेतला, त्यामुळे सोमवारी याबाबत काय निर्णय होते, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे,
गजेंद्र डोंगरे सहासिक न्यूज -24