शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आयोगाने गोठवले; निवडणूक आयोगाने घेतला खूप मोठा निर्णय
साहसिक न्युज24
नवी दिल्ली:शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. निवडणुक आयोग धनुष्यबाण चिन्हाचा फैसला सोमवारी देणार आहे. यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना-शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणुक आयोगाची बैठक झाली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली.
केंद्रीय निवडणूक आयोगाची ही बैठक तब्बल 4 तासानंतर संपली. शिवसेना आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने ही महत्वाची बैठक घेतली.
शिवसेनेला पुरावा सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिवसेनेने कागदपत्रांचा 700 पानांच गठ्ठा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता.
निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्हावर त्वरित सुनावणी घेऊ नये अशी शिवसेनेची मागणी आहे. एकनाथ शिंदे अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाहीत त्यामुळे सर्व कागदपत्र सादर होईपर्यंत सुनावणी घेऊ असं शिवसेनेचे म्हणण आहे. केवळ भाजपला फायदा होण्यासाठी शिंदेंची त्वरित सुनावणीची मागणी असल्याचा दावा देखील शिवसेनेने केला आहे.
अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेद्वारी दिली आहे. तर, अंधेरी विधानसभेची जागा भाजप लढवणार आहे.