शेतकऱ्यांचा शेतामधील वीज पुरवठा दिवसा सुरु करा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन
सिंदी (रेल्वे) : हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) या भागात शेतकऱ्यांना शेतामध्ये वीज पुरवठा दिवसा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन.
शेतकरी दिवसभर शेतात काम करत असतो, आणि वीज पुरवठा रात्रीच्या वेळेस सुरू राहत असल्यामुळे त्याला रात्रभर पण शेतात राहावे लागते. शेतामध्ये रात्री विज पुरवठा मिळत असल्याने रात्री बे-रात्री शेतकऱ्याला शेतामध्ये ओलितासाठी जावे लागते. वेळा परिसरात वाघाचा उद्रेक सुरू आहे. रात्रीच्या वेळेला वाघ, रानडुकरे, रोई यांच्या कधीही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा अपघात होण्याची भीती आहे. त्यांना आपला जीव मुठीत घेऊन शेतात ओलित करावे लागत आहे. शेतामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होणे. वीज कमी दाबाने होने जास्त प्रमाणात लोड आल्यामुळे तारा तुठून पडतात. यामुळे शेतीला पाणीपुरवठा करणारे कृषिपंप आणि ट्रान्सफ्रांमर देखील नादुरुस्त झाले आहे. यातून मोठा अपघात होण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी हॉलटेज प्रश्न उद्भवत आहे. वीज पुरवठा सुरळीत चालू राहण्याकरिता जिथे कमी दाबाने वीज पुरवठा होतो. तिथे उच्च दाबाने वीज पुरवठा व्हावा. जर दिवसाला १२ तास शेतकऱ्यांना वीजपुरवठा मिळाला तर शेतकऱ्याचा त्रास कमी होईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे अप्पर जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, गुणवंता कामडी, निरंजन नखाते, चंद्रशेखर बोरकर, दिनेश वैरागडे, अनिल सायंकाळ, शुभम सायंकाळ, धनराज लोणकर आदी उपस्थित होते.
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज-24