शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या- शेतकरी नेते गजानन निकम याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/पुलगाव:
अतिवृष्टीमुळे शेतीसह पिकांचे अतिनुकसान झाल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, पुरामुळे घराचे नुकसान झालेल्या प्रत्येक परिवारास 25 हजार रुपये आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते गजानन निकम यांनी केली आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली जिल्ह्यातील सर्वच भागात नदी व नाल्याच्या काठावरील सर्वच शेती खरडुन गेली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, पावसाळ्याच्या सुरवातीला लहरी पणामुळे पहिली पेरणी दबल्या गेली. तर काही ठीकाणी अंकुर निघुन वाळले . दुबार पेरणी नंतर पीके वर आली असता दि. 9. जुलैला दुपारी ढग फुटीसाखा पाऊस आला व होत्याचे नव्हते झाले . त्यानंतर 17 व 18 जुलैला आलेल्या मुसळधार पावसाने अति प्रमाणात नुकसान केले .शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे
नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात पालकमंत्री नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली व्यथा कुणाकडे मांडायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून महसुली यंत्रणा ,कृषी विभाग झालेल्या नुकसानीची पाहणी करीत आहे. जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण प्रचंड आहे. शेती गेल्या 20 दिवसापासून जलमय आहे .शेतात पर्यंत जाण्याकरिता रस्ते ही शिल्लक राहिलेले नाही ,शेती व घरांचेच नव्हे तर रस्ते व पूलांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जणू जिल्ह्यावर निसर्ग कोपल्याचा प्रत्येय येत आहे. गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास वारंवार हिरावल्या गेला. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाची वक्रदृष्टी झाली, शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याकरिता हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा .ज्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले त्या प्रत्येक घरमालकाला घर दुरुस्ती करिता तातडीने 25 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी .अशी मागणी गजानन निकम यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.