शेतीच्या नापिकीमुळे शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा.
वर्धा : जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी रामूजी नथ्थूजी चौधरी वय ८० वर्ष यांनी आपल्या शेतालगत असलेल्या झाडाला रात्री ९ वाजताच्या सुमारास गळफास लावून जीवन यात्रा संपवल्याची माहिती उघडकीस आली आहे.ही घटना १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.रामूजींच्या या अशा अचानक निघून जाण्याने परिवारातील लोक व आप्तस्वकीय हळहळ व्यक्त करीत आहे.गावात शोकाकुलाचे वातावरण निर्माण झाले आहे. रामूजींच्या मागे मोठा आप्त परिवार आहे.रामूजी हे गेल्या कित्येक दिवसांपासून शेती करायचे.त्यावरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागत असे.तसेच नांदगाव मौजा मध्ये शेत सर्वे नंबर ९३,आराजी २:२२ आर शेती आहे.मात्र गेल्या दोन-तीन वर्षा मध्ये रामुजींना अपेक्षेप्रमाणे शेतात पीक झाले नाही व यावर्षी सुद्धा शेतात नापिकी झाल्यामुळे ते सतत तणावात राहत होते यातच रामुजींनी आपल्या शेतालगत असलेल्या झाडाला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविली.सतत होत असलेली नापकीमुळे शेतकऱ्यांवर कर्जाची डोंगर होत आहे त्यामुळे शेतकरी आपली जीवन यात्रा संपवत आहे सतत होणाऱ्या आत्महत्येने शेतकऱ्याच्या मनावर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे या घटनेचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.
सागर झोरे साहसिक न्यूज -24