संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी.

0

सिंदी (रेल्वे) : स्थानिक सिंदी सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती येथे श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची 399 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपसभापती ए.सी. कलोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाला संस्थेचे माजी सभापती सुधाकर भुते, संस्थेचे संचालक शंकर काटोले उपस्थित होते. सर्वप्रथम संचालक शंकर काटोले यांच्याहस्ते संत जगनाडे महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले असे उपसभापती ए.सी. कलोडे यावेळी बोलतांना म्हणालेत. याप्रसंगी संस्थेचे कर्मचारी तथा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!