वर्धा / ही कलाकारांची खाण आहे. एकापेक्षा एक उत्कृष्ट कलाकार वर्धा नगरीने दिले आहे. अश्याच संगीत व नृत्य क्षेत्रातील १६५ उत्कृष्ट कलाकारांना एकत्र घेवून संदीप चिचाटे यांनी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे सादरीकरण महासंस्कृती महोत्सवात केले. व्यावसायिक कलाकारांनीही लाजवेल अशी प्रस्तुती स्थानिक कलाकारांनी हजारो रसिकांच्या उपस्थितीत महोत्सवात दिली.सांस्कृतिक कार्य विभाग , सांस्कृतिक कार्य संचालनालय व वर्धा जिल्हा प्रशासन व नगरपरिषद द्वारा तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन लोकमहाविद्यालय प्रांगणात करण्यात आले. या प्रसंगी संदीप चिचाटे निर्मित महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.यात मनस्विनी मंच,व्यक्तिमत्व विकास मंच,साक्षी डान्स अकॅडमी,वेदिका डान्स अकॅडमीतील नृत्य कलाकारांनी वासुदेव,पोवाडा,गोंधळ,जोगवा, मंगळागौरी,कोळी गीत,जागर, दिंडी, वारकरी अश्या एकापेक्षा एक कलाकृतीचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली तर संगीत संयोजक जीवन बांगडे,शैलेश देशमुख यांच्यासह गायक मयुर पटाईत, अभिजीत बुरघाटे, खुशबू कठाणे,प्रांजली गायकवाड, नीलिमा फासगे,गुणवंत सावरकर यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा गाण्याच्या माध्यमातून साकारण्याचा यशस्वी प्रयत्न केला.विजय बाभूळकर,किरण खडसे, यशस्वी फटिंगे, पंकज थूल ,आशिष ठाकरे, चंद्रकांत सहारे,श्रेया मोटघरे,घनश्याम गुंडावार, सुषमा व गौरव कहाते, रागिणी ठाकरे यांनी एकापेक्षा एक नृत्य सादर केले.ग्रामीण भागातून आलेल्या मांडवा शाळेतील ४५ विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी नृत्य रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले.
महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे नेपथ्य आशिष पोहाणे यांनी तर प्रकाश योजना ज्येष्ठ नाटय दिग्दर्शक विकास फटिंगे यांनी पार पाडली.रंगभूषा व वेशभूषा खुशी निलेश पोहेकर हिने बजावली. रंगमंचाचे व्यवस्थापन शास्वत धुरवे, मकरंद सातदेखे,मोहन सायंकार, सुनील तीतरे,जयंत भालेराव, सुरेश बरे, अतुल रुईकर,चंद्रकांत डगवार यांनी सांभाळली. लोकधारे चे संचालन ज्योती भगत व संदीप चिचाटे यांनी केले.स्थानिक कलाकारांच्या या यशस्वी सादरीकरणासाठी व कलाकारांच्या पुढील वाटचालीसाठी आमदार डॉ.पंकज भोयर ,जिल्हाधिकारी राहुल कर्डीले,मुख्याअधिकारी राजेश भगत प्रशांत बुर्ले, निलेश पोहेकर, प्रसन्न पाठक, अशोक कलोडे, जगदीश पोद्दार, अनिल नरेडी,अभिषेक त्रिवेदी,अजय वरटकर यांनी शुभेच्छा दिल्या.