सदगुरु आबाजी महाराज पुण्यतिथी उत्सवाला ५ डिसेंबर पासून सुरवात.
देवळी:-आबाजी महाराज संस्थान सोनेगाव आबाजी येथे सदगुरू आबाजी महाराजांचा पुण्यतिथी कार्तिक महोत्सव मंगळवार५ते९डिसेंम्बर पर्यंत संपन्न होणार आहे. दररोज अभिषेक, पूजा, आरती,भागवत, पुराण,हरिपाठ होणार आहे. सकाळी६वाजता आबाजी महाराजांचा रुद्राभिषेक होईल, रात्री८ते१०वाजता ह.भ.प रामबुवा काळे महाराज यांचे कीर्तन होईल, रात्री११वाजता तिगावकर मंडळींचे वारकरी भजन होईल ६डिसेंबर रात्री८ते ११वाजता मोहणबुवा कुबेर नागपूर यांचे कीर्तन होईल ६डिसेंबर सकाळी तीर्थस्थापणा यवतमाळ येथील चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते होईल, ७डिसेंबररोजी यवतमाळ येथील अशोक रुईकर यांचे अन्नदान होईल. रात्री११ते१२वाजेच्या दरम्यान श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन हभप सुरेंद्र महाराज मुळे करततील ८डिसेंबर ला सकाळी६वाजता मंत्रजागर होईल. रात्री९वाजता नगाजी महाराज यांच्या पालखीचे आगमन होईल.९डिसेंबर रोजी पहाटे ५वाजता नगाजी महाराज व आबाजी महाराज यांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होईल. सकाळी९वाजता डॉ. संजय अंदूरकर यांचे गायन होईल, दुपारी१ते३दरम्यान काल्याचे कीर्तन सुरेंद्र महाराज मुळे यांच्या हस्ते होईल, त्यानंतर दुपारी३ते५लोटांगण, पालखी सोहळा, रथयात्रा व दहीहंडी होईल,५वाजता महाप्रसाद होईल.
तरी या महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आव्हाहन लक्ष्मी नारायण मुरलीधर आणि आबाजी महाराज देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
सागर झोरे साहसिक न्यूज -24देवळी