समोरासमोर येताच एकमेकांना भिडले ; चाकूने सपसप वार करत एकाला केले जखमी
क्राइम प्रतिनिधी / वर्धा :
किरकोळ कारणावरून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या पोटावर च्याकूने वर केल्याची घटना मांडवा या गावामध्ये दि. 6 मे रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला वर्धा येथील रुग्णालयात उपचयारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर जखमीच्या मृत्यूपूर्व बयानावरून सावंगी पोलिसांनी हल्लेखोरविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अंकुश सीताराम भीमवणा वय . 35 वर्ष रा. मांडवा असे जखमीचे नाव आहे. याच गावातील सौरभ अनिल देवकाते याने जखमी अंकुशचे वडील शेतात जात असताना त्यांना रस्त्यात अडवले. व त्यांच्या सोबत वाद घातला. ही माहिती अंकुशला मिळताच तो वडिलांच्या मदतीला धाऊन गेला व त्याठिकाणी जावून अंकुक्षने आरोपी सौरभला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु सौरभने न जुमानता त्याने आपल्या खिशातून चाकू काढून अंकुशच्या पोटावर वार केले. ही घटना गावातील नागरिकांना माहिती होताच नागरिक घटनास्थळी पोहोचले . तोपर्यंत हल्लेखोर सौरभ घटणा स्थळावून पसार झाला होता. नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंकुशला उपच्यारासाठी रुग्णालयात हलविले. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी मृत्यूपूर्व बयानावरून आरोपी सौरभ अनिल देवकाते याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भादवी कलम 326 अन्वये गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सावंगी पोलिस घेत आहे.