*सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी दामिनी डेकाटे यांची निवड
सेलू:_ तालुक्यातील सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे यांची निवड करण्यात आली.. महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र राऊत आणि वर्धा विधानसभा अध्यक्ष रेणूका कोटंबकार यांनी आपल्या सभेत हिगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे यांचा सरपंच पदाचा यशस्वी कारकीर्द अनुभव पाहता त्यांची निवड सेलू तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली..आणि त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.आणि तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या समस्या शासनापर्यंत पोहचून संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करावे..असे नमूद केले..आणि शुभेच्छा दिल्या.. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व सरपंच संघटनेचे पदाधिकारी,जिल्हा,तालुका स्तरावरील सरपंच,उपसरपंच यांनी त्यांचे अभिनंदन केले..
वर्धा प्रतिनिधी सतीश अवचट