साखळी उपोषणाने मार्ग निघाला नाही तर आक्रमक आंदोलन करण्यात येईल- अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस रा.कॉ.पार्टी..

0

दहेगाव (गो) येथे रेल्वे थांबे करिता चालू असलेल्या साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थन.

🔥साखळी उपोषणाला राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी भेट देत दिले जाहीर समर्थन.

सिंदी (रेल्वे) : तुळजापूर रेल्वे स्थानक दहेगाव येथे रेल्वे गाडयाचा थांबा मिळण्याकरिता रामकिशोर शिंगणधूपे यांचे साखळी उपोषन सुरू आहे. या साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाहीर समर्थन दिले. दहेगाव येथे कोरोना काळात आधी सहा रेल्वे गाड्या चालू होत्या. आता चार वर्षे लोटूनही दोन रेल्वे गाड्या सुरू आहे. आणखी रेल्वे थांबे मिळण्याकरिता विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर शिंगणधुपे यांच्या नेतृत्वात दहेगाव (गो) येथे साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.दहेगाव / तुळजापूर येथील जवळपासच्या २५ गावातील नागरिक, विद्यार्थ्यांना रेल्वे गाड्या संबंधी अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दहेगाव येथे रेल्वे थांबे तात्काळ देण्यात यावे, अन्यथा दहेगाव शहरातील सर्व राजकीय पदाधिकारी व शहरातील सर्व नागरिक मोठे जन-आंदोलन करणार असा ईशारा दिला आहे.

दिनेश घोडमारे साहसीक न्यूज/24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!