साटोडा येथे विविध कार्यक्रमाने”राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा”…

0

वर्धा / जि प उच्च प्राथमिक शाळा, साटोडा येथे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अरुणा हजारे यांनी केले,मुख्याध्यापक रवींद्र पावडे,स अ अरुणा हजारे,नितेश आडे,विज्ञान शिक्षिका मंजिरी डुकरे यांनी रमण इफेक्ट व जीवन चरित्रावर प्रकाश टाकला .त्यानंतर “विज्ञान प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले यात वर्ग-7 प्रथम तर द्वितीय वर्ग–6 नी पटकाविला.
विज्ञान रांगोळी स्पर्धेचे पण आयोजन करण्यात आलेले होते,यात प्रथम क्रमांक वर्ग 7,द्वितीय क्रमांक वर्ग 6 व तर तृतिय क्रमांक वर्ग 4 नी पटकावला.
विज्ञान प्रयोगशाळेत वर्ग 7 नी 1 ली ते 6 वी च्या विद्यार्थ्यांना प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले,सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कु.आदिती सहारे वर्ग 6 नी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

 चैताली गोमासे साहसिक न्यूज /24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!