साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर येथे गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकावर प्रवासी निवारा नसल्याने प्रवासी वैतागून गेले आहेत उन्हात पावसात प्रवासी खुल्या जागेवर उभे असतात कधी कधी आजुबाजुच्या दुकानांचा साहारा घेऊन बसतात परंतु बस कधी येतात आणि जातात याचा मात्र पत्तांच लागत नाही त्यामुळे साहुर येथील बसस्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल होतात प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने साहुर बसस्थानकावर स्त्रियांकरीता व पुरुषांकरीता मुतारीची सोय करण्यात आली परंतु ही मुतारी ग्रामपंचायत च्या वतीने नवीन पद्धतीने बसविण्यात आली की काय कोणालाही कळत नाही प्रवासी मुतारी पर्यंत जातात आणि परत येतात त्यामुळे साहुर बसस्थानक हा एक चर्चेचा विषय ठरला आहे ग्रामपंचायतला आलेला निधी खरच त्याचा योग्य वापर होत आहे का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे आष्टी पंचायत समितीच्या वतीने साहुर ग्रामपंचायतीकडे लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने सुटली की काय असा प्रश्न उपस्थित प्रवासी करतात वरिष्ठ अधिकारी निद्रा अवस्थेत असल्याने हा प्रकार घडत असुन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे हे विशेष.