🔥साहुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये कार्यशाळा संपन्न.
साहुर -/ आष्टी तालुक्यातील साहुर येथील ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली असून यामध्ये प्रामुख्याने सात घटकांवर विशेष भर दिला आहे हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असून शंभर दिवसांच्या कालावधीत गावाचा जर सर्वांगीण विकास केला आणि ग्रामपंचायतला जर विकासाचे चांगले गुण मिळाले तर पैशाच्या स्वरूपात मोठे पारितोषिक मिळणार असल्याने आपल्या गावाचा विकास कशाप्रकारे करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती श्री ईश्वरभाऊ वरकड होते तसेच साहुर ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश गायकवाड सचिव जवंजाळ साहेब, तलाठी खरात साहेब,उपसरपंच ढवळे ताई ,सांभारे मॅडम ,वंदना वरकड ,शिला घोरपडे ,प्रशांत काकपुरे , गोपाल गावंडे, राजु राऊत विजय गावंडे,प्रविण धांदे पांडुरंग हिवरे,राजेश खरडे प्रमोद बिजवे, प्रफुल मुंदाने,सुभाष कोकणे , सुरेश टरके, प्रसाद वरकड, श्रीकृष्ण खिरडकर ,व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, बचत गटांच्या महिला त्याचप्रमाणे गावातील नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम जवंजाळ साहेब यांनी प्रास्ताविक करून सर्व माहिती नागरिकांना दिली तसेच सरपंच प्रकाश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती श्री ईश्वरभाऊ वरकड यांनी विस्तृत माहिती नागरिकांना सांगितली यावेळी सर्वांनी एक होऊन गावाचा चांगला विकास करण्याचे ठरविले हे विशेष