सिंदीत शिव महोत्सव निमित्त भव्य दिंडी व पालकी मिरवणूक सोहळा

0

🔥 दिंडीत 14 भजन मंडळाचा                        समावेश                                                                   🔥 हरी नामाच्या जयघोषाने दुमदुमली सिंदी नगरी

सिंदी (रेल्वे).सार्वजनिक शिवमंदिर कमेटी पळसगाव रोड वार्ड क्रमांक 17 सिंदी (रेल्वे) येथील अखिल भारतीय साई गुरुदेव मंडळ सिंदी यांच्या वतीने सोमवारी शिव महोत्सव निमित्ताने शहरात भव्य दिंडी व पालकी मिरवणुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत हरिनामाचा जयघोष करीत असंख्य भाविभक्त व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान, हरी नामाच्या जयघोषाने सिंदी नगरी दुमदुमली होती.
सालाबादप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवमंदिर कमेटी पळसगाव रोड येथील अखिल भारतीय साई गुरुदेव मंडळ सिंदीच्या वतीने दिनांक 26 व 27 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रविवारी मंदिरात दीपप्रज्वलन करून सायंकाळी जय माता चंडिका बालक मंडळ तारसावंगा येथील गायक चंदू कळसाईत यांनी मधुर सुरात महादेवाचे गाणे गायले. सोमवारी पहाटे शहरात ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी 8 वाजता घटस्थापना व अभिषेक झाला. सकाळी 9 वाजता रमेश अटेल यांच्याहस्ते गोपाळकाला करण्यात आला.
सार्वजनिक शिवमंदिर कमेटी पळसगाव रोड येथून दुपारी 12 वाजता भव्य दिंडी व मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने बसस्थानक ते नंदी चौक तेथून जुने पोलीस स्टेशन येथुन मार्गक्रमण करीत सायंकाळी 6 वाजता सार्वजनिक शिवमंदिर कमेटी येथे पोहचली. या दिंडी सोहळ्यात परिसरातील 14 भजन मंडळांनी आपला सहभाग नोंदविला. दरम्यान, टाळ मृदंगाचा गजर करीत हरी नामाच्या जयघोषाने सिंदी नगरी दुमदुमली होती. या मिरवणुकीत घोड्यावर विराजमान महादेवाची वेशभूषा साकारणारा तरुण दुर्गेश हेडावू हा सिंदी करांचे लक्ष वेदत होता. सायंकाळी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले होते.
दिंडी व पालखी मिरवणूक सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी नगर सेवक अकिल शेख, भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल वर्धा जिल्हा अध्यक्ष पंकज बावणे, मंदिराचे अध्यक्ष गजानन पोईनकर, दीपक गाते, कवडू पाटील, चंदू गेडाम, राजू बोटरे, संजय उईके, दिनेश कांबळे, राजू खडतकर, सूर्यभान बावणे, रमेश कापटे, कुंडलिक नागोसे, किशोर खंडाळे, रमेश मडावी, राजू सुरजूसे, श्याम दुधकर, नारायण बावणे, सचिन बावणे, तुकाराम वरठी, चंदू कुंभारे, लीला किरनाके, नंदा निखारे आदींनी अथक परिश्रम घेतले.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!