सी.आय.यु. पथकाकडून दारूबंदी प्रकरणात १२,९१,४००/- चा माल जप्त

0


वर्धा : दिनांक १०-१०-२०२३ रोजी पहाटे ०२-०० ते ०४-०० वा. दरम्यान सी.आय.यु. पथकाला मिळालेल्या माहिती प्रमाणे नाकाबंदी करीत असता एक कार मारुती सुझुकी सियाझ क्र. MH 04 HM 7912 ही संशयीतरीत्या मिळून आली त्यांना विचारपूस करून वाहनाची तपासणी केली असता गाडीत दारूमाल असल्याचे दिसून आले. वरून गाडीतील आरोपी 1) योगेश उर्फ सोनू मदनलाल विश्वकर्मा वय 30 वर्षे रा. समता नगर वर्धा (चालक) 2) सौरभ उर्फ लाला राजेश यादव वय 21 वर्षे रा. भीमनगर सावंगी मेघे यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून 1) 180 ml चे royal stag कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 168 बॉटल्स प्रती की.350₹ नुसार 58,800/-₹ 2) 90 ml चे रॉयल स्ताग व्हिस्की चे 12 बॉटल्स की. 1800/-₹ 3) 180 ml चे O.C. Blue कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 156 बॉटल्स की.46,800/-₹ 4) 90 ml चे O.C. Blue कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 100 बॉटल्स की. 15,000/-₹ 5) 180 ml चे ऑफिसर चॉईस कंपनीचे व्हिस्की ने भरलेल्या 312 बॉटल्स की. 78,000/-₹ 6) 500 ml चे ट्यूबर्ग कंपनीचे बिअर कॅन की. 19,200/-₹ 7) 180 ml चे रॉयल चॅलेंज कंपनीचे व्हिस्की चे 48 बॉटल्स की.16,800/-₹ 8) 90 ml चे टांगो पंच देशी दारूचे 500 बॉटल्स की. 30,000/-₹ 9) एक कार मारुती सुझुकी सियाझ क्र. MH 04 HM 7912 किंमत 10,00,000/- 10) आरोपि जवळ एकूण 3 मोबाईल किँमत 25,000/-₹ अशा एकूण 12,91,400/-₹ चा माल जप्त करण्यात आला.

गुन्ह्यात अधिक तपास केला असता सदर दारूमाल अटक आरोपी यांनी कार मालक सौरभ जितेंद्र भगत वय 23 वर्षे रा. गणेश नगर बोरगांव मेघे याचे सांगण्यावरून उदय बार वानखत जिल्हा अमरावती येथील बार मालक राजू जैस्वाल रा वर्धा याचे बार मधून आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सुद्धा गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

उपरोक्त प्रकरणी पोलीस स्टेशन वर्धा शहर अपराध क्रमांक १२८६/२०२३ कलम ६५(ई) ७७(अ) ८३ म.दा.का. सहकलम २७९ भादवी सहकलम १३०, १७७ मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप गाडे (विशेष पथक), स्था.गु.शा., रुद्रा वानखेडे, स्था.गु.शा. वर्धा पोलिस हवालदार रोशन निंबोळकर नायक पोलिस अंमलदार सागर भोसले पोलिस अंमलदार अभिजित गांवडे, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, मंगेश आदे, अभिषेख नाईक, हर्षल सोनटक्के यांनी केली..

   अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!