सुप्रसिद्ध पार्श्व गायिका अनुपमा देशपांडे यांचा गीत गायन कार्यक्रम
प्रतिनिधी / वर्धा:
सृजन मुजिकल आणि जय महाकाली शिक्षण संस्था वर्धा द्वारा दि. १२ मार्च ला सायंकाळी ७ वाजता शिवशंकर सभागृह, अग्निहोत्री कॉलेज, रामनगर, वर्धा येथे सुप्रसिद्ध पार्श्व गायिका अनुपमा देशपांडे यांचा गीत गायन कार्यक्रम आयोजित केला आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्रतिबंध असल्यामुळे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता आला नाही परिणामी वर्धकराना मनोरंजना पासून वंचित राहावे लागले. त्यामुळे वर्धेकरांच्या आग्रहास्तव एक विरंगुळा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पासेस तयार करण्यात आल्या असून त्या प्राप्त करून सदर कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
सुप्रसिद्ध पार्श्व गायिका अनुपमा देशपांडे यांचा एक मखमली, आर्त, मनाला शांत भावणारा, भक्तीत तल्लीन करणारा एक मधुर मधाळ स्वराची अनुभुती या कार्यक्रमातून प्रेक्षकांना येईल. अनुपमा देशपांडे यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात हि कोरस गायिका म्हणून केली आणि त्यांनी फिल्मफेअर बेस्ट प्लेबॅक सिगर पुरस्कार मिळवून हिंदी चित्रपट सृष्टीत मनाचे स्थान मिळविले. त्यांना गुजरात व महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट गायिका पुरस्काराने तसेच पश्चिम बंगाल सरकार तर्फे उत्तम कुमार अवॉर्ड ने सम्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी ९२ चित्रपटा मध्ये एकूण १२४ गाणे गायिली आहेत. त्यामध्ये सोनी महिवाल, सैलाब, काश या प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना १९८४ मध्ये आलेला हिंदी चित्रपट सोनी महिवाल मधील “सोहनी चिनाब दें या गाण्याला सर्वश्रेष्ठ गायिकेचा पुरस्कार मिळाला, परंतु त्यांना खरी ओळख १९९० मध्ये आलेला चित्रपट सैलाब मधील “हमको आज कल है इंतजार” या गाण्यामुळे मिळाली. पार्श्व गायिका अनुपमा देशपांडे यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार दादा कोंडके, राम लक्ष्मण, ए. आर. रहमान, इलायराजा, लक्षमी-प्यारे, बप्पी लाहिरी, राजेश रोशन, शिवहरी सारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसोबत आपले कार्य केले आहे.
त्यांच्या या महान कार्या बद्दल त्यांना संगीत भूषण जीवन गौरव पुरस्काराने जय महाकाली शिक्षण संस्थेद्वारा गौरविण्यात येणार आहे.
अश्या या महान गायिकेला प्रत्यक्ष ऐकण्याची सुवर्ण संधी या कार्यक्रमाच्या निमित्याने उपलब्ध झाली आहे तरी सर्व श्रोतिक जणांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे