सुमित्रा वैद्य यांचे शैक्षणिक कार्य महत्वाचे,. कवी प्रशांत ढोले..

0

देवळी / ज़िल्हा उच्च प्राथमिक शाळा, कोळोणा (चोरे )येथील मुख्याध्यापिका वयोमनानुसार निवृत्त होत असल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ उच्च प्राथमिक शाळा, कोळोणा (चोरे )येथे संपन्न झाला. यावेळी कवी, समीक्षक, शिक्षक प्रशांत नामदेवराव ढोले हे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते म्हणाले…’मा. सुमित्रा चांदेकर सुमित्रा शरद वैद्य )यांनी अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थी यांना घडविण्याचे काम केलेले आहे. त्यांनी ३६वर्ष सेवा केलेली आहेत. त्या इंग्लिश, हिंदी या विषय शिकवायच्या. त्यांचे अनेक विद्यार्थी मोठया पदावर कार्यरत आहेत. त्या विद्यार्थी यांचेसोबत रममाण होत.त्यांचा सत्कार शाळा व्यवस्था पण समिती अध्यक्ष त्र्यबक उईके, सारिका अढाऊ, मंगेश काकडे, चावरे, मंगला कौराते यांनी भेट वस्तू देऊन सत्कार केला.शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ढोले,प्रविणा मैत्रे मॅडम, राजश्री शेरजे मॅडम यांनी शाल, भेट वस्तू देऊन.सुमित्रा शरद यांचा सत्कार केला. विद्यार्थी यांनी सौ. सुमित्रा वैद्य यांचा सत्कार केला.कशिश नंदकुमार भस्मे वर्ग ७वा हिने सुमित्रा वैद्य मॅडम यांचेबद्दल गौरवउदगार काढले. समृद्धी प्रमोद कौराते हिने आपल्या सवेदना व्यक्त केल्या. सूत्र संचालन राजश्री शेरजे यांनी केले. आभार प्रविणा मैत्रे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद वैद्य, पराग शरद वैद्य, पायल वरभे, दिनेश वरभे, अक्षता ढगे, शिरीष ढगे, पराग वैद्य, प्रणाली वैद्य, शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांनी विशेष प्रयत्न केले.

सागर झोरे साहसिक न्यूज /24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!