पार्डी शेत शिवारात बेपत्ता शेतकऱ्याचा मूतदेह आढळून आला,मुतक हा आर्वी तालुक्यातील जळगाव गावचा रहिवासी…

0

मृतक जळगाव येथील शेतकरी राजू रामचंद्र उईके वय ४५ वर्ष

आष्टी शहीद / तळेगाव (शा. प.)पोलीस स्टेशनं च्या हद्दीत येणाऱ्या पार्डी शेत शिवारात दि.३ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता एका झुडूपात कुजलेल्या अवस्तेत मूतदेह दिसून आल्याने एकच खळबळ उडाली.सविस्तर असें कि,आर्वी तालुक्यातील जळगाव येथील रहिवाशी राजू रामचंद्र उईके वय ४५ वर्ष यांची पत्नी ही माळेगाव तालुका कारंजा येथे माहेरी निघून गेली आणि पत्नी विरहमुळे तो मानसिक रुग्ण झाला. मानसिक तबियत बरोबर नसल्याने तो चार दिवसापासून जळगाव येथून बेपत्ता होता.तो पार्डी गावात तो पाच दिवसापूर्वी कुणाला तरी दिसला होता असा सुर आहॆ.परंतु ३ मे रोजी गावातील गुराखी यांना एका झुदुपात एक मूतदेह कुजलेल्या अवस्तेत दिसताच त्यांनी कुणालाही न सांगता गावात आला.व मूतदेह दिसला ही वार्ता त्याने काही निवडक व्यक्ती कडे कथन केली.तसेच काही तास लोटल्यावर ही बाब वाऱ्यासारखी गावात पसरली.पोलीस पाटील अरविंद चाफले यांनी घटना स्तळं गाठले आणि खात्री केली तेव्हा यां घटनेची माहीती तळेगाव पोलिसांना देण्यात आली. तळेगाव चे ठाणेदार, उप पोलीस निरीक्षक पाळणाटे,पोलीस बिट जमादार राजेश साहू यांनी घटना स्तळं गाठून मूतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविली व पंचनामा केला.उत्तरीय तपसणी साठी मूतदेह आर्वी उपजिल्हा रुग्णालय यात पाठविला नातेवाईक यांनी ओळख पटवून मूतदेह हा राजू रामचंद्र उईके वय ४५ राहणार जळगाव बेलोरा यांचा असल्याचा खुलासा झाला.मुतक याला फिट येण्याची बिमारी होती आणि त्याचा त्यात मुतू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.तळेगाव पोलीस पुढील तपास करित आहॆ. पोलीस उपनिरीक्षक पाळणाटे, राजेश साहू पुढील तापस करित आहॆ.

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!