सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नामुळे आर्वी विधानसभा क्षेत्रात विकास,मकरंद देशमुख….

0

आष्टी ( शहीद ) -/ गेल्या दोन वर्षापासून सुमित वानखेडे यांनी अनेक विकास कामे खेचून आणल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास निश्चित होईल असे प्रतिपादन जनशक्ती संघटना आष्टीचे संस्थापक अध्यक्ष मकरंद देशमुख यांनी केले. ते आष्टी येथील मुस्लिम कब्रस्तान कमिटी द्वारा आयोजित सुमित वानखेडे यांच्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून अता खान, सत्कारमूर्ती सुमित वानखेडे, प्रमुख अतिथी म्हणून शेख जमील, रमजान अन्सारी, शेख आमिर, कमलाकर निंभोरकर, वकील अहेमद, अनिस खॉं नवाब, शफिऊल्ला खान, रियाज अहमद खान, फीरोजोद्दीन काजी, नासीर अहेमद, अब्दुल जलील, सय्यद अफसर अली, शहा मोहंमद खान, राजेश ठाकरे, देवानंद डोळस, युसुफ शेख इ. उपस्थित होते.सुमित वानखेडे यांनी आष्टीतील कब्रस्तानच्या सौंदर्यीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. त्याबद्दल मुस्लिम कब्रस्तान कमिटीच्या वतीने सुमित वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला.देशमुख पुढे बोलताना म्हणाले, आष्टी तालुक्यातील युवकांसाठी रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने एमआयडीसी करिता सुमित वानखेडे यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.सत्काराला उत्तर देताना सुमित वानखेडे यांनी मुस्लीम समाजाकरिता अनेक योजना आहेत त्या योजनांचा अभ्यास करून विद्यार्थी, युवक यांनी योजनांचा लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक दुर्बल घटकांना १०% आरक्षण दिले त्याचा अत्याधिक लाभ मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना व युवकांना होत असल्याचे नमूद केले. मुस्लीम समाजाने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.शेख जमील, रमजान अन्सारी, शेख आमिर व अता खान यांनी समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक रियाज अहेमद खान यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

नरेश भार्गव साहसिक news-24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!