सेलू -/मेल्यावर खांदा देण्या पेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्यावा आधार नसलेल्या हाताला आधार कुणी द्यावा बाप म्हातारा झाला म्हणून का वृद्धाश्रमात न्यावा ज्यांनी फक्त तुझी स्वप्ने साकार केली त्याला हा दिवस द्यावा विसरला रे तू भावा आधार नसलेला हाताला खरंच आधार कोणी द्यावा एक हात मदतीचा म्हणून निराधार बाबांना माहेर शांती निवास सेलू येथील येळाकेली भाग्यलक्ष्मी भजन मंडळांनी राखी बांधून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे हा आपुलकीचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला तसेच माहेर हिरा महिला वृद्धाश्रम मध्ये महिलांना वस्त्र दान करण्यात आले या कार्येक्रमाचे आयोजन सर्वधर्म समभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धेच्या अध्यक्ष दीपमाला मालेकर यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित माहेर शांती निवास चे अध्यक्ष अतुल शेळके व पूर्ण कर्मचारी वर्ग अक्षय पिंपळे,आशा ढोबरे,सुरेखा धोंगडे,कुसुम दुधबडे,रुपाली गव्हाळे,चंद्रभान भांडेकर,सरला भांडेकर,महादेव जोगे, पुष्पा भांडेकर,दिलीप गडकरी,मंदा धोंगडे,कमला किरमे,गिरजा चापडे,सुनंदा लटारे,वैभव दूधबडे,लीला सातपुते,आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.