सेलसुरा शिवारातील बिबट वाघाची वाटचाल, वनविभागाणे नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा
सेलसुरा शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
वर्धा जील्हातील सेलसुरा शिवारामध्ये वाघ,बिबट चे अस्तित्व आढळून आले आहेत.तसेच वन विभागाने नागरिकांना निर्देशन दिले की शेतात काम करतांना समूहाने काम करावे,रात्रीचे वेळी शेतात जाताना सोबत बॅटरी टॉर्च घेऊन जावे,हातात घुंगराची काठी ठेवावी तसेच रेडिओ मोबाईलवर गाणी सुरू ठेवावीत,घराचे अंगणात किंवा परिसरामध्ये लहान मुलांना एकटे सोडू नका,अंगणात परिसरात विजेचा दिवा बल्ब चालू ठेवावा,गुरख्यांनी तसेच शेतकऱ्यांनी आपले गुरे चारायला घेऊन जाताना जमावाने जावे सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर जनावरे घेऊन जंगलाचे दिशेने जाऊ नये,किंवा जंगलामध्ये गुरे ढोरे ठेवू नये, विनाकारण वन्य प्राण्यांना डिवचू नये वन्य प्राण्यास जखमी करू नये त्यांचा पाठलाग करू नये, आपल्या पशुधनांची रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधणी करताना गोटा सर्व बाजूंनी बंदिस्त राहील याची दक्षता घ्यावी,असे वनविभागाचे सहाय्यक जी के गायकवाड यांनी सांगितले.तसेच सेलसुरा शिवारातील त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.सध्या शेतकरी बांधवांनी शेतामध्ये तूर कपाशी सोयाबीनची लागवड केली आहे रोज शेतकरी बांधवांना शेतामध्ये काम करण्यासाठी जावे लागतात मात्र हंगामात वाघ शेतामध्ये आढळल्याने परिसरात सेलसुरा शीवारात भीतीचे वातावरण तयार झाले आहे .त्यामुळे शेतकरी ऐन हंगामात आर्थिक अडचणीत सापडला आहेत.तसेच वनपरीक्षेत्र सहाय्यक गायकवाड यांनी शेतकरी बांधवांना सतर्कतेचे आव्हान केले.तसेच वनविभागाचे बिबट वाघाची शोध घेण्याची मोहीम कसून चालू आहे असे वनपरिक्षेत्र सहाय्यक गायकवाड यांनी सांगितले.
सागर झोरे सहासिक न्यूज -24