सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाकडे वेधले लक्ष,जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन 

0

🔥सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाकडे वेधले लक्ष,जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

सेवाग्राम -/ सेवाग्राम विकास आराखडा हा विकास आणि सौंदर्यिकरणासाठी महत्वाचा ठरला आहे.यातून अनेक चांगल्या गोष्टी घडत असल्या तरी काही गोष्टी ह्या तेवढ्याच मारक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या बाबिंकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी.यांना सेवाग्राम येथील नागरिकांनी दिनांक ९ जुलै रोजी सह्यानिशी निवेदन दिलेले आहे.

      शासन आणि विविध सामाजिक संघटना वृक्षारोपण करून पर्यावरण तसेच सरकार , शासनाच्या योजना,उपक्रमांना सहकार्य करीत आहेत.येवढेच नाही तर आता तर संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.पण यात सेवाग्राम वर्धा मार्गावर सेवाग्राम विकास आराखड्यात पॉज पाईंट निर्माणाचे चे काम सुरू आहे यात काही झाडाभोवती सिमेंट काँक्रेट टाकण्यात आल्याने त्या झाडांना वाढण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने ती वाळणार यात शंका नाही.

      प्रसिद्ध महात्मा गांधी आश्रम मार्गावर सहा आणि कस्तुरबा रूग्णालय समोरील मुख्य मार्गावर दोन वाळलेली झाडे आहेत.या बाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला अवगत केले आहे.पण ती झाडे अजूनही काढण्यात आली नसल्याने पावसाळ्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

       महामहिम राष्ट्रपतींनी महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट दिली.त्या वेळी मुख्य मार्गावरील गतीरोधक काढण्यात आली होती.ती परत लावण्यात यावी तसेच सर्वात गर्दीचा मेडिकल चौकात गतीरोधक लावण्यात यावे जेणेकरून अपघात होणार नाही अशीही मागणी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना केली.

       सेवाग्राम हे ऐतिहासिक गाव असून आश्रयामुळे जगात ओळख आहे.तत्कालीन प्रसंगे शिल्पाच्या माध्यमातून चौकात उभारण्यात आली पण त्याची दुरावस्था होत आहे असल्याने शासनाचा पर्यायाने जनतेच्या पैशाचा दुरूपयोग होत असल्याचे दिसून येत असल्याने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही याकडेही लक्ष वेधले.

अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सुध्दा निवेदन दिले आहे.

      निवेदन देताना अनिल देवतळे,अरूण मोरे, दिलीप चव्हाण उपस्थित होते.निवेदनावर सतीश मोरे, प्रमोद राऊत, राजेश घुडे, धनराज बलवीर, संतोष बुरडकर, नारायण पोटे,रामराल करपाते,विठ्ठल शंभरकर, मनोज ताकसांडे,श्रेयश घुडे,रहिम शेख इ.च्या सह्या आहेत.

           ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!