स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा कडुन गिरोली येथे घडलेल्या वृध्द इसमाच्या खुनासह घरफोडीच्या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करून गुन्ह्यातील आरोपीतांना शिताफीने २४ तासात केले अटक
स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा कडुन गिरोली येथे घडलेल्या वृध्द इसमाच्या खुनासह घरफोडीच्या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करून गुन्ह्यातील आरोपीतांना शिताफीने २४ तासात केले अटक
सहासिक न्यूज-24
सागर झोरे/देवळीफिर्यादी नामे प्रविण अरुण डहाके, वय ३४ वर्षे, रा-गिरोली, ता.देवळी, जि.वर्धा यांनी दिनांक ९ रोजी पोलीस स्टेशन देवळी येथे येवून तक्रार दिली की,त्यांचे वडिल नामे अरुण किसनाजी डहाके,वय ६५ वर्षे,रा. गिरोली हे नेहमीप्रमाणे दिनांक ८ सप्टेंबर रोजी रात्रीचे जेवण करून घरामध्ये रात्री एकटे झोपले असता रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यानी त्यांचे हॉलमध्ये घरात चोरी करण्याचे झराद्याने प्रवेश करून घरातील स्टील डब्यात ठेवून असलेले नगदी अंदाजे १ लाख रु.चोरी करुन त्यांना धारदार शस्त्राने डोक्यावर,मानेवर मारुन जिवानिशी ठार करून चोरट्यांनी पोबारा केला.अशा फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलीस,स्टेशन देवळी येथे अप. क्र. कलम ३०२,४६० भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक,वर्धा व अपर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट
देवून परीस्थीतीची पाहणी करून अज्ञात आरोपीतांचा तातडीने शोध घेवून गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करण्याच्या
सुचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना व पोलीस स्टेशन देवळी येथील अधिकारी,अंमलदार यांना दिल्या.
सदर गुन्ह्यातील वयोवृद्ध इसमास ठार करून त्यांचे घरात चोरी केल्याबाबतच्या संवेदनशील घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा.पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेची (०४ वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु असताना सखोल तांत्रिक तपास व मुखबिरकडुन मिळालेल्या माहितीवरून सदरचा गुन्हा त्याच्या नातवानेच केला असल्याबाबत संशय निर्माण झाल्याने अशा खात्रीशिर माहितीवरुन त्यासंबंधी पुरावे प्राप्त करुन मृतकाचा नातू (विधीसंघर्षात बालक) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देवुन सांगितले की, त्याला त्याचा मित्र मयूर उर्फ महेश गजानन कोडापे,वय १९ वर्षे, रा. सार्वजनीक बांधकाम विभाग कॉर्टर्स, वर्धा,तसेच हर्षल दिलीपराव पारडकर, वय १९वर्षे, रा-प्राजक्तानगर,वर्धा यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी महिला आश्रम येथील चहा कैटीनवर एकत्र येवुन त्याच ठिकाणी चर्चा करुन त्याचे गिरोली येथे राहणारे आजोबा अरुण डहाके यांचेकडे भाजीपाला विक्रीचे भरपुर पैसे असतात व आज आजी सुध्दा त्याचेसोबत नाही ते एकटेच आहेत त्यामुळे आपण त्यांचे घरी चोरी करु असा कट रचून मथुरचे पाठ या रंगाचे मोपेड गाडीने तिथेही गिरोली येथे रात्रीचे दरम्यान पोहचुन आजोबा यांना आवाज दिला,आजोबा यांनी दार उघडले असता त्यांचे डोक्यावर कठीण वस्तूने प्रहार करून त्यांना जिवानीशी ठार मारले व घरातील अलमारी मध्ये ठेवलेले पैसे व दागिने चोरी करून त्यानंतर सोबतची बॅग वायगाव हिंगणघाट रोडवर नेरी गावाजवळ टाकुन वर्धा येथे परत येवुन आलेल्या चोरीच्या पैशाची व दागिन्यांची तिघांनी वाटणी करून घेतली. त्यावर यातील सहभागी इतर ०२आरोपीतांना वर्धा येथुन तात्काळ ताब्यात घेवून सर्वांना स्वतंत्रपणे विचारपूस केली असता तिघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन देवळी येथे तपास अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, वर्धा नूरुल हसन,अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी,पुलगाव संजय पवार, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, सपोनि संतोष दरेकर,दिपक वानखेडे, पोउपनि अमोल लगड,राम खोत, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, हमीद शेख,गजानन लामसे,मनोज धात्रक,चंद्रकात बुरंगे,नरेंद्र पाराशर, श्रीकांत खडसे,राजेश तिवसकर, सचिन इंगोले,प्रमोद पिसे,दिनेश बोधकर,रामकिसन इप्पर, मनिष कांबळे,प्रफुल वाघ,नितीन इटकरे, पवन पन्नासे,गोपाल बावनकर,रितेश शर्मा,संघसेन कांबळे,राकेश आष्टनकर,संजय बोगा,विनोद कापसे,अंकित जिथे, शिवकुमार परदेशी,गणेश खेवले,गजानन दरणे, अलका कुलवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यांनी केली.