स्वतःला सफेद पोश समजणारे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप दर महिन्याला नऊ लाखाची लाच पचवितात कशी? पोलिस वर्तुळात चर्चा
By साहसिक न्युज 24
क्राईम प्रतिनिधी /वर्धा:
वर्धा शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियूष जगताप यांनी मागील तीन वर्षापासून खाकीवर्दी च्या नावाखाली मालुताई कार्यक्रम सुरू केला आहे.
राबदार ‘चेहरा’ असणाऱ्या जगताप यांनी वर्धा शहराचा पदभार स्वीकारतात स्वतःची प्रतिमा सफेद पोश दाखविली आणि दर महिन्याला अवैद्य धंदेवाल्यांना कडून आपले दर महिन्याचे हप्ते बांधून घेतले अवैध धंदेवाल्यांची वसुली करण्यासाठी दोन शूर वीर पोलिस शिपायाची नियुक्ती केली. दर महिन्याच्या एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत वसुली केल्या जात आहे. दहा तारखेपर्यंत वसुली आली नाही तर सदर अवैध धंदे बंद करण्याचे आदेश जगताप साहेबांचे शूर शिपाई देतात.दैनिक साहसिक च्या चमूने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या हद्दीत येत असलेल्या सात पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदेवाल्यांची संपर्क केला असता दहेगाव (गो.) येथील पोलिस स्टेशन मधून अवैध धंदेवाल्याकडून पैसा वसूल केल्या जात नाही. सर्वात जास्त अवैध वसुली रामनगर पोलिस स्टेशन मधून केल्या जाते. दैनिक साहसिक टिमनी प्राप्त केलेले पोलीस स्टेशन कडून मिळत असलेली अवैध रकमेचे आकडे वाचकांच्या व पोलिस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून देत आहे. वर्धा शहर पोलिस स्टेशन मधून दर महिन्याला 1 लाख 25 हजार रुपये , सेवाग्राम पोलिस स्टेशन मधून 30 ते 40 हजार,रामनगर पोलीस स्टेशन 1 लाख 50 हजार ते 2 लाख पर्यंत, सावंगी पोलिस स्टेशन मधून 75 हजार ते 1 लाख पर्यंत सिंध्दी रेल्वे पोलीस स्टेशन 60 हजार ते 70 हजार रुपये, सेलू पोलीस स्टेशनमधून 1 लाख 50 हजार रुपये ते 2 लाख रुपयापर्यंत वसुली करीत असल्याचे सत्य माहिती दैनिक साहसिक ला
प्राप्त झाली आहे. तसेच अवैध रेती माफियांकडून दर महिना 2 लाख तर अवैध डिझेल पेट्रोल विक्रेत्याकडून 1 लाख रुपयांची अवैध वसुली जगताप साहेबांचे शूरवीर शिपाई अमर लाखे व आनंद भस्मे करीत आहे. काही अवैध धंदेवाले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जात आहेत . असा संशय असणाऱ्या व्यक्तींस शूरवीर शिपाई लाच घेत नाही . शूरवीर शिपाई यांचे जवळचे मित्र नातेवाईक यांच्या जवळ अवैध धंद्याची रक्कम जमा केल्या जाते, अशा प्रकारे आपल्या जिल्ह्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप हप्ता वसुली करतात. तसेच स्वतःला कोणाच्या बापाला भीत नाही अशी डरकाळी फोडणारे जगताप राजकीय नेत्यांचा फोन येताच कायद्याची पायमल्ली करीत आरोपीला अटक करतात .विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे या लाचखोर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करतील का? असा प्रश्न वर्धा वासी विचारत आहे. स्वतःला ‘सफेद पोश’ समजल्या जाणाऱ्या जगताप यांनी वर्धा जिल्ह्यातून कोट्यावधीची अवैद्य कमाई जमवली आहे. दैनिक सहासीक चे वृत्त खरे आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी 2 शूर शिपायांचे मोबाईल नंबर चेक केले केल्यास अवैध धंदेवाल्या सोबतंचे घनिष्ठ संबंध उघडकीस येईल.
(क्रमशः)