हलाखीच्या परिस्थिती त दहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या मु्तूची वार्ता येताच पेठअहमदपूर गाव हळहळले.
मुतक ओंकार विनोदराव वरुडकर वर्ग दहावा हुतात्मा विद्यालय आष्टी
🔥आठ दिवसापूर्वी पडला होता आजारी.
🔥दोन दिवसाच्या पूर्वी झाले कॅन्सर चे निदान, तिसऱ्या दिवशी मृत्यू.
आष्टी शहीद :- आष्टी नजीकच्या पेठअहमदपूर येथील रहिवाशी व दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ओंकार विनोदराव वरुडकर वय १६यांना तिनं दिवसा पूर्वी उपचारासाठी अमरावती च्या पंजाबराव मेडिकल मध्ये उपचारासाठी भरती केलें. तपसनी केल्यावर ब्लड कॅन्सर चे निदान झाले आणि पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल मध्ये भरती केलें. दोन दिवस उपचार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दि.२७डिसेंबर रोजी रात्री ९.३०वाजता ओंकार नें शेवटचा स्वास घेतला. मु्तूची बातमी गावात येताच पेठअहमदपूर गाव हळहळ ले.
सविस्तर असें कि,
पेठ अहमदपूर येथील रहिवाशी विनोदराव वरुडकर यांना दोन मुले व दोन मुली व पत्नी असा त्यांचा परिवार आहॆ. घरी शेती नाही तरी हार न मानणारे वरुडकर कुटुंब परिस्तिथी शी दोन हात करून परिवाराची झुंज सुरु आहॆ. शेत मजुरीची कामे करून मिळेल त्या पैशातून परिवाराला जगविण्याचे काम विनोदराव करित आहॆ. मोठया मुलीचे लग्न केल्यावर दोन मुले व मुलगी शिक्षण घेत होती. असताच ओंकार हा लहान मुलगा असून तो सध्या दहाव्या वर्गात हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आष्टी येथे शिक्षण घेत होता. सकाळी दुकानावर व सुटीच्या दिवशी दुकानात अल्पशा मजुरीवर काम शिक्षण घेण्यासाठी पैसे गोळा करित होता. शाळेत नियमित जाऊन अभ्यास करित होता. अभ्यास मध्ये हुशार असल्यामुळे त्यांची तळमळ सर्वाना माहिती आहॆ. अशा ताच ओंकार हा आठ दिवसा पूर्वी शरीरावर गाठा आल्या म्हणून आजारी पडला आई वडिलांना काळ्जी वाटली म्हणून तयांनी खाजगी दवाखान्यात उपचार केलें. नंतर त्याची तबियत हाता बाहेर जाऊ लागली आणि पुढील उपचार करण्यासाठी त्याला अमरावती येथील पंजाबराव मेडिकल कॉलेज मध्ये भरती केलें. तपसनी केल्यावर रिपोर्ट आले त्यात ओंकार ला ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान स्पष्ट झाले. पुढील उपचारासाठी ओंकार ला नागपूर मेडिकल मध्ये भरती करण्यासाठी न्या म्हणून सांगितले. जवळ पैसे नाही अशाही परिस्थितीत न डागमगता वडिलांनी त्याला मेडिकल कॉलेज नागपूर ला उपचारासाठी दाखल केलें. दोन दिवस उपचार सुरु असताना तिसऱ्या दिवशी दि.२७डिसेंबर रोजी रात्री ९.३०वाजता ओंकार नें जगाचा निरोप घेतला. ओंकार च्या मुर्त्यूची वार्ता गावात येताच संपूर्ण गाव हळ हळ व्यक्त करित होते. घरची परिस्थिती जेमतेम असून पोटच्या मुलाला पैसे नसल्याने उपचार करू शकलो नाही अशी खंत मुतक ओंकार चे वडील विनोद राव व आई संगीता ही नें दुःख द व्यथा दै. पुण्य नगरी च्या प्रतिनिधी कडे कथन केली. दि.२८रोजी स्थानिक मोक्ष धामावर गावकर्यांनी उपस्थित राहून ओंकार वर श्रद्धांजली वाहिली.
नरेश भार्गव साहसिक न्यूज-24 आष्टी शहीद