हिंगणघाटात वादळाने उडाले गोल्हर जिनिंगचे छत
Byसाहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/वर्धा:
हिंगणघाट भागाला वादळी वारा व पावसाने चांगलेच झोडपून काढले. हिंगणघाट पासून अंतरावर असलेल्या कडाजना येथील गोल्हर जिनिंग व ऑईलचे छत उडाले . यामध्ये तब्बल दीड कोटींचे नुकसान झाल्याचे संचालक धनराज गोल्हर यांनी सांगितले.
बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास वादळीवारा व पावसाला सुरूवात झाली. वार्याचा वेग इतका प्रचंड होता की गोल्हर जिनिंग व ऑईलचे छत जमिनदोस्त झाले. तसेच छतावरील पत्रे तब्बल 400 ते 500 मीटर अंतरापर्यंत उडाले. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. छत कोसळल्याने अनेक मशिनरींचे प्रचंड नुकसान नुकसान झाले. छताचे लोखंडी पोल हॉपर व कन्व्हेअर वर पडल्याने निकामी झाले. लगतच गोल्हर इंडस्ट्रीजची दाल मिल आहे. यातील काही कामगार शेडनजिक साफसफाईचे काम करीत होते. परंतु, प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले. तब्बल दीड कोटीच्या घरात नुकसान झाल्याचे संचालक धनराज गोल्हर यांनी सांगितले. या घटनेची माहिती हिंगणघाट पोलिस ठाणे व सबंधित तहसील कार्यालयाला देण्यात आली असून पंचनामा झाल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा कळेल.