हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याच्या हालचालीला शासन स्तरावर वेग.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांना पत्र.
शैक्षणिक,आरोग्य सुविधा व इतर विकासाच्या बाबतीत हिंगणघाट तालुका माघारलेला.
हिंगणघाट:- ३० डिसेंबर रोजी हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचा अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे तसेच पालकमंत्री सुधीर मनगंटीवार यांची भेट घेऊन जिल्हा घोषित करण्याबाबत चर्चा केली होती व निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्या मागणीचे पत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुढील कारवाई करिता पाठविण्यात आले आहे त्यामध्ये त्यांनी निवेदनात विशद केलेले मुद्दे विचारात घेऊन हिंगणघाट जिल्हा निर्माण करण्याची विनंती केली आहे त्या अनुषंगाने याबाबत शासन स्तरावर योग्य निर्णय घ्यावा असे विशद करण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्र माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनासुद्धा पालकमंत्र्याच्या वतीने पत्र नुकतेच पाठवण्यात आले आहे.या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेऊन चर्चा केली व हिंगणघाट जिल्हा का हवा आहे आणि सिंधी (रेल्वे) ला तालुक्याचा दर्जा देण्याबाबत संपूर्ण मुद्दे चर्चेदरम्यान पटवून दिले.
वर्धा जिल्ह्याचा परिसर हा आर्वी- आष्टी- कारंजा ते हिंगणघाट-समुद्रपूर तालुक्यातील गिरडच्या टोकापर्यंत
असून लोकसंख्या वाढली आहे. हिंगणघाट परिसराला नागपूर,चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याच्या सिमा लागल्या असून हायवेचे रोड जोडल्या गेले आहे.
यवतमाळ जिल्ह्याचा परिसर वणी तालुका, केळापुर तालुका (पांढरकवडा) ते आणि तालुक्यातील तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या सिमेपर्यंत असून खुप मोठ्या प्रमाणात व्यापला असून जिल्ह्याची कामे करतांना नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचा वरोरा, चिमुर तालुका हिंगणघाट परिसराला १५ ते २० किलो मिटर अंतरावर लागून आहे.नागपूर जिल्ह्याचा उमरेड तालुक्याचा परिसर ३० कि.मी. अंतरावर जोडला गेला आहे.
हिंगणघाट परिसराला यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर (पांढरकवडा) तालुका, वणी तालुका राळेगाव तालुका लागून आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमुर तालुके जवळ आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याचा परिसर सभोवताल आहे.
नागपूर ते कन्याकुमारी नॅशनल हायवे नं. ०७ हा हिंगणघाट तालुक्याच्या परिसरातून गेलेला असून मोठ्या प्रमाणात दळण-वळणाची साधने उपलब्ध आहे. नागपूर ते मद्रास रेल्वे-लाईन हिंगणघाट परिसरातून गेली आहे. नागपूर ते चंद्रपूर नॅशनल हायवे आंध्रप्रदेशच्या परिसराला जोडला गेला आहे.
हिंगणघाट परिसराला नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर जोडून हिंगणघाट जिल्हा निर्माण होऊ शकतो. लोकसंख्या आणि परिसिमा यांचा भौगोलिक विचार लक्षात घेता हिंगणघाट जिल्हा घोषित करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली होती.त्याबाबत पाठपुरावा सुरू असून शासन स्तरावर जिल्हा घोषित करण्यासंदर्भात वेग आले असून हालचाली सुरू झाल्या आहे.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज/24