हिंगणघाट जिल्हा तसेच सिंदी(रेल्वे) तालुका घोषित करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे.
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,सहकार मंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी.
हिंगणघाट : सिंदी (रेल्वे) तालुका घोषित करण्यात यावा तसेच हिंगणघाट जिल्हा घोषित करण्याबाबद महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक- सचिव तथा माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी सोबत गंगाधर कलोडे,सुरज कोपरकर,पवन कस्तुरे,वैभव मानोकर,सागर अबोरे,आशिष देवतळे,मनोज तिमांडे उपस्थित होते.
राज्यातील मोठया आणि दुर्गम तालुक्यांचे विभाजन करून नविन तालुके निर्माण करण्याची कार्यवाही तीन महिन्यात पुर्ण होणार असल्याची माहिती महसुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.
आयुक्तांच्या समितीने पदांची निर्मिती निश्चित केली असुन मोठया तालुक्यांसाठी २४ पदे, मध्यमसाठी २३ आणि लहान तालुक्यासाठी २० पदांची निर्मिती ठरवुन आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर तीन महिन्यात नविन तालुका निर्मितीबाबद कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री महोदयांनी जाहीर केले.
सिंदी (रेल्वे) या गावाला नगर पंचायत असुन १७ नगरसेवक आहे. सिंदी (रेल्वे) ही मोठी बाज़ारपेठ असुन ८० ते ९० गावांचा समावेश आहे. वर्धा जिल्हयातील समुद्रपुर तालुक्यातील कांढळी जिल्हा परिषद सर्कलचा संपुर्ण परिसर सिंदी (रेल्वे) गावाला लागुन आहे. तसेच वर्धा तालुक्यातील हमदापुर जिल्हा परिषद सर्कलचा संपुर्ण परिसर सिंदी (रेल्वे) गावाला लागुन आहे. नागपुर जिल्हयाचा भाग सुध्दा सिंदी (रेल्वे) गावाला लागुन आहे.
सिंदी (रेल्वे) येथे नागपुर -वर्धा-हिंगणघाट-मद्रास ते भुसावळ रेल्वे लाईन जात असुन गाडयांचे थांबे आहेत. सिंदी (रेल्वे) प्राथमिक स्वास्थ केंद्र आहे. सिंदी (रेल्वे) येथे शैक्षणिक दृष्टया ५ ज्युनिअर कॉलेज असुन ६ हायस्कुल आहे. सिंदी (रेल्वे) ला लागुन नागपुर ते मुंबई समृध्दी महामार्ग लागला असुन ३० ते ४० कि.मी. अंतरावर नागपुर विमानतळ आहे.
तरी सर्व भौगोलिक परिस्थितीचा अंदाज लक्षात घेता सिंदी (रेल्वे) तालुका घोषित करण्यात यावा.
वर्धा जिल्हयाचा परिसर हा आर्वी -आष्टी-कारंजा ते हिंगणघाट -समुद्रपुर तालुक्यातील गिरडच्या टोकापर्यंत असुन लोकसंख्या वाढली आहे. हिंगणघाट परिसराला नागपुर – चंद्रपुर, यवतमाळ जिल्हयाच्या सिमा लागल्या असुन हायवेचे रोड जोडल्या गेले आहे.
यवतमाळ जिल्हयाचा परिसर वणी तालुका, केळापुर तालुका (पांढरकवडा) ते आर्णि तालुक्यातील तेलंगाना व आंध्रप्रदेश च्या सिमेपर्यंत असुन खुप मोठया प्रमाणात व्यापला असुन जिल्हयाची कामे करतांना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चंद्रपुर जिल्हयाचा वरोरा, चिमुर तालुका हिंगणघाट परिसराला १५ ते २० किलोमिटर अंतरावर लागुन आहे. नागपुर जिल्हयाचा उमरेड तालुक्याचा परिसर ३० कि.मी. अंतरावर जोडला गेला आहे.हिंगणघाट परिसराला यवतमाळ जिल्हयातील केळापुर (पांढरकवडा) तालुका, वणी तालुका,राळेगांव तालुका लागुन आहे. चंद्रपुर जिल्हयातील वरोरा, चिमुर तालुके जवळ आहे. नागपुर जिल्हयातील उमरेड तालुक्याचा परिसर सभोवताल आहे.
नागपुर ते कन्याकुमारी नॅशनल हायवे नं. ७ हा हिंगणघाट तालुक्याच्या परिसरातुन गेलेला असुन मोठया प्रमाणात दळण वळणाची साधने उपलब्ध आहे. नागपुर ते मद्रास रेल्वे लाईन हिंगणघाट परिसरातुन गेली आहे. नागपुर ते चंद्रपुर नॅशनल हायवे आंध्रप्रदेशच्या परिसराला जोडल्या गेला आहे.
दि.२०.१२.२०२३ रोजी महाराष्ट्र सरकारने हिंगणघाटला मेडिकल कॉलेज मंजुर केल्याची घोषणा केली आहे. नागपुर येथिल एयरपोर्ट ७० कि.मी.अंतरावर आहे.
हिंगणघाट परिसराला लागुन नागपुर,चंद्रपुर,यवतमाळ जिल्हयाचा परिसर जोडुन हिंगणघाट जिल्हा निर्माण होऊ शकतो.लोकसंख्या आणि परिसिमा यांचा भौगोलिक विचार लक्षात घेता हिंगणघाट जिल्हा घोषित करण्यात यावा अशी जन मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक- सचिव तथा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या वतीने करण्यात आली.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज/24 हिंगणघाट