हिंगणघाट शहरात तृतीयपंथीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी.
हिंगणघाट : शहरातील जुन्या श्रीराम टॉकीज परीसरात तृतीयपंथींच्या दोन गटात देणगी मागण्याचे वादातून तुंबळ हाणामारी झाली.
आज दुपारी १२ वाजता चे दरम्यान वर्धा वरून आलेल्या तृतीयपंथीच्या एका गटाने सिनेस्टाईल ऑटोमधून येत येथे हजर असलेल्या तृतीयपंथीच्या गटावर हल्ला चढविला.सदर टोळी नागपूर येथील असल्याची माहिती मिळाली असून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कार्यक्षेत्राबाहेर देणगी म्हणून रोख रक्कम गोळा करीत असल्याने ही तुंबळ हाणामारी झाली.
पुढे सणासुदीचे दिवस येत असल्याने सदर तृतीयपंथी काल पासून शहरातील बाजारपेठेत फिरून दुकानदारांकडून वसुली करीत असल्याची माहिती वर्धा येथिल तृतीय पंथीच्या गटाला मिळाली.
नागपूर जिल्हयातील तृतीयपंथी जिल्ह्यात कुठेही वसुली करण्याची किंवा देणगी मागण्याची परवानगी नाही, आपसी समजस्यानुसार प्रत्येक गटाचे कार्यक्षेत्र ठरले आहे, आज ही बाब मोडीत काढीत नागपूर येथील ९-१० तृतीयपंथीनी शहरात प्रवेश करीत वसुली सुरू केली असता या गटाला धडा शिकविण्यासाठी वर्धा येथील तृतीयपंथीच्या गटाने हल्ला चढविला.
सदर हाणामारीचे वृत्त पोलिसांना मिळताच शहरातील पोलिस पथक घटनास्थळी पोचले, दोन्ही तृतीयपंथीच्या गटाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले, तेथे या दोन्ही गटाला समज देऊन पोलीसांनी सोडून दिले.
तृतीयपंथीच्या या राड्यादरम्यान एका गटाने नागपूर येथील काही तृतीयपंथीला मारहाण करीत कपडे फाडण्याचाही प्रयत्न केला. हा सर्व प्रकार खुलेआम रस्त्यावरती घडल्याने हजारो बघ्यांनी एकच गर्दी केली.
ईकबाल पहेलवान साहासिक न्युज-24 हिंगणघाट