हिंगणा नगर पंचायतमध्ये अतिक्रमणावरून वाद! नगरसेवकांकडून पथकाला अडथळा – दलित पत्रकाराला अभद्र आई बहिणीच्या शिवी देत धमकी!

0

🔥नगरसेवक विष्णू कोल्हे नगर पंचायत हिंगणा.

🔥हिंगणा नगर पंचायतमध्ये अतिक्रमणावरून वाद! नगरसेवकांकडून पथकाला अडथळा – दलित पत्रकाराला अभद्र आई बहिणीच्या शिवी देत धमकी!

(सोशल मीडियावर धमकी देण्याचा व्हिडिओ व्हायरल)

नागपूर -/ हिंगणा नगर पंचायत परिसरात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान मोठा वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे नगरसेवक विष्णू कोल्हे यांनी नगर पंचायतच्या पथकाच्या कारवाईत अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याच प्रकरणात बातमी प्रकाशित करणारे पत्रकार प्रा.सतीश भालेराव यांना देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. इतकेच नव्हे तर पोलिस विभागाशीही उग्र भाषेत बोलून “अतिक्रमण हटवू देणार नाही” असा इशारा दिल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर प्रा. भालेराव यांनी संबंधित प्रकरणाची माहिती हिंगणा पोलीस निरीक्षक, एमआयडीसी एसीपी, डीसीपी झोन १ आणि नागपूर पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत गेलेली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही देण्यात आली आहे. तसेच नगर पंचायतचे मुख्याधिकारी धनंजय सरनाईक यांनाही याबाबत अवगत करण्यात आले असून, त्यांनी यासंदर्भात पोलिस विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

सध्या या प्रकरणाकडे नागरिकांचे आणि प्रशासनाचे लक्ष लागले असून, पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्राध्यापक भालेराव यांनी नगरसेवक विष्णू कोल्हे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत तथा पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 अंतर्गत नोंदवण्याची तक्रार हिंगणा पोलीस स्टेशनला दिलेली आहे. भालेराव म्हणाले की 2020 ला एमआयडीसी पोलीस स्टेशनला ज्याप्रकारे भालेराव यांना जीवघेणा हल्ला झाला होता व जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता त्याच प्रकारे विष्णू कोल्हे यांनी ते पण त्याच सहकार यांचे नातेवाईक असल्याने भालेराव यांची ॲट्रॉसिटी ची केस एव्हिडन्सवर येत्या 16 एप्रिल ला नागपूर स्पेशल कोर्टात आहे.
जोपर्यंत नगरसेवक विष्णू कोल्हे यांना सेल सेंट्रल जेलची वारी करवणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील पत्रकार संघटना शांत बसणार नाही, नगरसेवक कोल्हेचा माज काढल्याशिवाय ऑल इंडिया पॅंथर सेना व महाराष्ट्रातील पत्रकार संघटना गप्प बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 हिंगणा,नागपूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!