वर्धा -/ नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेशपूर्व परीक्षेत स्थानिक गांधी सिटी पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी आरोही पटेवार हिने यश संपादन केले. त्यामुळे तिची जवाहर नवोदय विद्यालय सेलू काटे येथे प्रवेशासाठी निवड झाली आहे.
वैशाली मेंढेवार यांच्या मार्गदर्शनात तिनी यश संपादन केले.
आरोही ने आपल्या यशाचे श्रेय शिक्षिका वैशाली मेंढेवार वडील सामजिक कार्यकर्ते व मंच संचालक किरण पटेवार आई दिपाली पटेवार यांना दिले आहे.
आरोहीच्या या यशाबद्दल कुटुंबीयासह शिक्षक व मित्र परिवारात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.