१ मे कामगार दिनी वर्धा आयटक कामगार मेळावा व शहिद गोविद पानसरे स्मृती पुरस्कार सोहळा
साहसिक न्युज 24 रिपोर्ट:
आयटक च्यावतिने स्थानिक बच्छराज धर्मशाळा येथे १ मे २०२२ रविवार रोजी कामगार मेळावा व कामगार नेते शहिद काँ गोविंद पानसरे ७ वे स्मृती पुरस्कार सोहळा आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला
मेळाव्याचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांनी लोकशाहीर काँ अण्णाभाऊ साठे डॉ बाबासाहेब आंबेडकर व शहिद काँ गोविंद पानसरे यांच्या फोटोला मालार्पण करुन दिप प्रज्वलन करुन केले.कामगार कर्मचाऱ्यांच्या एकजूटीनेच न्याय मिळेल तसेच कष्टक-यासाठी लढणारे सत्य बाजू लोकांपुढे आणनारे साहित्यिक लेखक काँ गोविंद पानसरेपृ यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे प्रतिपादन केले
ते पुढे म्हणाले देशभरात कामगार दिन तर संयुक्त महाराष्ट्चा विजय म्हणून महाराष्ट्र दिन राज्यभर साजरा केला जात आहे.सयुक्त महाराष्ट्राचा लढा कामगारांमुळेच यशस्वी झाला असे मत व्यक्त केले .
तसेच कामगार नेते काँ गोविंद पानसरे ७ वा स्मृती पुरस्कार वर्धा जिल्ह्यातील पत्रकार मनोज रायपूरे , आंनद इंगोले, श्याम उपाध्याय , संजय ओझा , विनोद पाटील, पाच पञकारांना शाल स्मृती चिन्ह व शिवाजी कोण होता? ही पुस्तक देवून संम्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे होते तर . मुख्य अतिथी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रा.ज पराडकर ,जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ . राजेन्द मुंडे .कामगार संघटना संयुक्त कृती समिती अध्यक्ष काँ गुणवंत डकरे ,युवा शोसल फोरम अध्यक्ष सुधिर पांगुळ काँ सुरेश टारपे गजेन्द सुरकार आरोग्य कर्मचारी संघटनेचे सिध्दार्भ तेलतुंबडे वंदना उईके आशा गटप्रवर्तक ज्योषणा राउत शबाना शेख सोनाली पडोळे प्रतिभा वाघमारे शाहीर धर्मा खडसे गोपाल काळे मैना उईके विनायक न्नोरे जयमाला बेलगे यांची उपस्थिती होती.
प्रास्तावीक जिल्हा अध्यक्ष काँ मनोहर पचारे यांनी केले.
कामगार कायदे व कामगारांचे प्रश्न या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पञकार रविन्द कोटंबकार यांच्या वर झालेल्या हल्याचा निषेध करण्यात आले व मुख्य सुञधार यांचा शोध घेवून दोषीवर कार्यवाही करण्याचा यावे अशा ठराव घेण्यात आला*
तरी जिल्ह्यातील संघटित असंघटीत कामगार मोठ्या संख्येनी सहभागी होते.
संचालन सुरेश गोसावी यांनी तर आभार जिल्हा सचिव वंदना कोळणकर यांनी केले
माया तितरे वैशाली नंदरे यांनी गीत सादर केले
निलेश साटोणे दिलीप धुडे विणा पाटील अरुणा नागोसे चंदा मेसराम शारदा कांबळे आमरपाली बुरबुरे माला भगत सुजाता घोडे शोभा बोंदरे रंजना डफ बडू लाडे रामकृष्ण महल्ले संजय डफरे शकर मोहदूरे रमेश बोदरकर शंकर हुलके रामदास जांभुळकर मयुर महाजन राजेश फाले शरद डांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले