६८व्या राज्यस्तरीय ज्युनियर बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेचे थाटात उद्घाटन.
राज्य स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडणार
शेगाव : माऊली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चे चेअरमन ज्ञानेश्वरदादा पाटील व माऊली स्कूल ऑफ स्कॉलर च्या मुख्याध्यापिका मृणालताई पाटील यांच्या संकल्पनेतून व द महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन बॅडमिंटन .असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान शेगाव येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या चार दिवस चालणाऱ्या अजिंक्य स्पर्धेचे उद्घाटन २७ ऑक्टोबर ला माऊली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रांगणात पार पडले या उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून मा पांडुरंग दादा पाटील सहकार नेते कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील चेअरमन माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन शेगाव, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर जाधव प्राचार्य माऊली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी शेगाव, मृणालताई विश्वेश्वर पाटील मुख्याध्यापिका माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगाव, माननीय वाय राजाराव सचिव बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया, मा. बाळकृष्ण महानकार जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा, डॉ. पि.के. पटेल अध्यक्ष महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन, मा अतुल इंगळे सचिव महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन, माननीय डॉ. दीपक कवीश्वर सचिव आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया, गोसावी कार्याध्यक्ष महाराष्ट्र बोर्ड बॅडमिंटन असोसिएशन प्रा. रूपाली पापडकर कार्यकारी समिती अध्यक्ष बाल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया मा राजा भांडारकर निरीक्षक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त , निलेश महाजन अध्यक्ष बाल बॅडमिंटन असोसिएशन बुलढाणा हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच रेफरी बोर्डाचे चेअरमन सोबत दत्ता निवड समितीचे चेअरमन हरीश काळे व राज्य संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रशांत दार उद्घाटन सोहळ्याची सुरुवात माऊली गुलाब स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी त्याद्वारे व स्वागत गीता द्वारे केली याप्रसंगी उद्घाटक माननीय पांडुरंग दादा पाटील यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले व खेळ हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे हे खेळाडूंच्या मनावर गुंबवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव वाय राजाराव सर यांनी खेळाडूंना बॉल बॅडमिंटन फेडरेशन खेळाडूंना साठी करत असते योजनांबद्दल माहिती दिली तसेच आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चे चेअरमन ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी क्रीडा क्षेत्रात त्यांच्या महाविद्यालय व माऊली स्कूल ऑफ स्कॉलर च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध प्रयत्नाबद्दल खेळाडूंना माहिती दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंनी मंचा समोरून आपापल्या जिल्ह्याचे सुंदर पथ संचालन केले केले.
स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रतील ३१ जिल्ह्यातील ५६ संघाणी सहभाग घेतला होता .स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बुलढाणा बाल बॅडमिंटन असोसिएशनचे विजय पळसकर, राजेश्वर खंगार, विश्वजीत ठाकूर , प्रफुल राऊत, गव्हाणकर सर, राहुल भगत, कमलेश सर ,शेळके सर, आमले सर ,राम त्रिकाळ, व माऊली स्कूल ऑफ स्कॉलर चे क्षिक्षकगण आदी स्पर्धेच्या यशस्वी नियोजन करण्यासाठी मेहनत करत आहे.
सागर राऊत सहासिक न्यूज-24