13 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वर्ध्यात
प्रतिनिधी / वर्धा:
केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी दि.13 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
रविवार दि.13 फेब्रुवारी रोजी सावंगी (मेघे) येथे दुपारी 12.20 वाजता दत्ता मेघे ईन्स्टिट्यूट आँफ मेडिकल सायन्सद्वारा आयोजित सिध्दार्थ गुप्ता मेमोरियल कँन्सर हाँस्पिटलच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता सावंगी मेघे येथून नागपूरकडे प्रयाण करतील.