देशाचा युवा सुदृढ तर राष्ट्र सुदृढ,जस्टीस अरुण चौधरी.
वर्धा / कुठल्याही क्षेत्रात आपणास कितीही प्रावीण्य प्राप्त झालेले असले तरी बदलत्या काळानुसार आणि आधुनिकतेच्या या वातावरणात आपले कला कौशल्य आपणास अद्यावत ठेवता आले पाहिजे. कला, क्रीडा, साहित्य हा बदलत्या काळाचा आरसा असतो त्यामध्ये आपले प्रतिबिंब स्पष्ट आणि उठावदार दिसावे यासाठी आपणास मेहनत आणि परिश्रम याशिवाय पर्याय नाही. स्पोर्ट कराटे असोसिएशन तर्फे बोरगाव (मेघे) या ग्रामीण ठिकाणी होत असलेले विविध खेळ – क्रीडा प्रकार हे आपल्या व्यक्तित्व विकासाचा केवळ एक पैलू नसून सर्वांगीण सुरक्षिततेच्या आणि शारीरिक सुदृढतेचा पायाभरणी कार्यक्रम आहे. देशाचा युवा सुदृढ असला तर हे राष्ट्र सुदृढ आणि सक्षम ठरते असे प्रतिपादन पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी व्यक्त केले.
ते 14 मे रोजी बोरगाव (मेघे) येथे सत्येश्वर लॉन येथे स्पोर्ट कराटे असोसिएशन द्वारा आयोजित 14 दिवसीय शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था आणि अभिमत विद्यापीठ सावंगी मेघे चे विशेष कार्यधिकारी डॉ. अभ्युदयजी मेघे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, माजी पोलीस उप आयुक्त चंद्रकांत उदगीकर, जमील अहमद, स्पोर्ट कराटे असोसिएशनचे जिल्हा संरक्षक इमरान राही, अध्यक्ष सतीश ईखार, उपाध्यक्ष मोहन मोहिते कोषाध्यक्ष विजय सत्याम, संचालक प्रकाश खंडार, शिहान उल्हास वाघ, सावता परिषदचे अध्यक्ष विनय डहाके प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
प्रस्तावना करताना इमरान राही म्हणाले की, अनेक कार्यक्रमाची सुरुवात पुढाकाराचे प्रथम पाऊल उचलणे अभिनंदनीय ठरते मात्र निरंतर 14 वर्षापासून अविरतपणे उपक्रम म्हणून तो कार्यक्रम राबवणे ही गौरवास्पद बाब आहे. या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्या अनेक खेळाडूंनी विभिन्न क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून स्वतः आणि या संस्थेला सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले आहे ते उल्लेखनीय बाब आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी मोहनबाबू अग्रवाल, अभ्युदयदादा मेघे, सतीश अंभोरे, अनिल निमगडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
क्रीडा व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू सौ सुप्रिया घडे व डॉक्टर भाग्यश्री मोहिते यांना शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच सहभागी शिबिराची विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला स्पोर्ट कराटे असोसिएशन संस्थेचे निखिल सातपुते, प्रवीण पेठे, खेमराज ढोबळे, सुनील चंदनखेडे, हरीश पाटील, शेखर भागवतकर उपस्थित होते.
शिबिरात प्रशिक्षक म्हणून हेमलाताताई काळबांडे, सचिन झाडे, कु. अवंतिका तपासे, सेन्साई तेजस निवल, कार्तिक भगत, शुभम राकडे, अनुज कांबळे, पूजा गोसटकर, सौ. सुवर्णा मुळे, सेम्पाई भार्गव खेवले, रुजान बागमोरे, निल नेहारे यांनी 14 दिवस सेवा दिल्याबद्दल मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन शिहान मंगेश भोंगाडे यांनी केले तर आभार सौ. कल्याणी भोंगाडे यांनी मानले. कार्यक्रमाला पप्पू दांगट, प्रवीण कळंबे, हरीश काळंबे, पुष्पाताई तपासे, नम्रताताई चंदनखेडे, उज्वलाताई निवल, पियुष हावलादार, काजल रोकडे, डॉ. अभय मोहिते, डॉ. जितेंद्र खेवले, नंदकिशोर खोंड, सुकेशनी बागमोरे, अनुज सिंग, प्रतीक कन्नाके, समीर ठाकरे, ओम राजभर, वैभव मुडे, आर्यन बागमारे इत्यादी गावकरी नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.