वाढदिवसाच्या आनंदावर वादाचे विरजण, केक कापताना तरुणाचा टोळक्याने केला खून
By साहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे / वर्धा:
वर्ध्यात लोक महाविद्यालयाच्या मैदानावर वाढदिवसाचा केक कापताना मध्यरात्री खुनाचा थरार अनुभवायला मिळाला आहे. 24 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या तरुणाचा केक कापताना मध्यरात्री शुल्लक कारणावरून चाकूने वार करीत खून करण्यात आला.
घटना रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुकाराम वार्डातील अक्षय सोनटक्के हा 23 वर्षाचा तरुण आपल्या मित्रांसह लोक महाविद्यालयाच्या मैदानात केक कापत होता याच दरम्यान दुचाकीने आलेल्या काही तरुणांच्या गाडीचा कट लागला यावरून वाद निर्माण झाला. गाडीवरून आलेल्यांनी अक्षय ला मारहाण करण्यास सुरुवात केली प्रकरण मारहाणीवरस थांबले नाही तर चाकूने सपासप वार करीत अक्षयला रक्तबंबाळ केले यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात पुलफैल येथील मयुर गिरी, ऋषी दिनेश बैरवार, निलेश मनोहर पटेल या तिघांन सोबत पाच अल्पवयीन तरुणांच्या टोळक्याने अक्षय ला मारहाण केल्याचे समोर आले आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मुख्य आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. विधी संघर्ष अल्पवयीन तरुणांकडून पोलीस माहिती घेत आहे मित्रांसोबत वाढदिवसाचा केक कापणे अक्षय सोनटक्के या तरुणाच्या जीवावर चांगलेच बेतले आहे.
अलीकडे मध्यरात्रीच्या सुमारास मित्रांना सोबत घेणे आणि पार्टी करणे तसेच रस्त्यावर मैदानात किंवा एखाद्या निर्जनस्थळी केक कापण्याची फॅड तरुणांमध्ये वाढले आहे. परंतु तरुणांच्या अशा बेभान वागण्याला पालकांकडून जरब असणे तेवढेच महत्त्वाचे आहे आपला मुलगा मध्यरात्री कुठे जातोय काय करतोय याकडेही आता लक्ष देण्याची जबाबदारी वाढली आहे अशात पोलिसांची रात्रीची गस्त काय करते हा सुद्धा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.