548 रुपयांची पॅन्ट पडली 99 हजारात
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
समुद्रपूर तालुक्यातील दहेगाव उजवणे गावातल्या तरुणाला ऑनलाइन पॅन्ट खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. 548 रुपयांचा पॅन्ट या तरुणाला 99 हजार रुपयात पडला आहे. ऑनलाइन पॅन्ट तर घरी पोहचला पण तो साईजमध्ये होत नसल्याने परत करण्यासाठी राजकुमार विनोद बाभुळकर या युवकाने ऑनलाइन खरेदी ऐप च्या कस्टमर केअर शी संपर्क साधला. आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या तावडीत हा नकळत सापडला. या युवकाने आपला फोन पे चा पिन देखील त्या भामट्याला टाकला. राजकुमारच्या खात्यातून 99 हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने सायबर भामट्याने वळती केलीय. राजकुमारची पॅन्ट तर परत मिळाली नाहीच याउलट हा पॅन्टच 99 हजार रुपयांत पडला आहे. या फसवणूक प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेय.