7,000 हजार रुपयांची लाच घेताना औषध निरीक्षकास व दलालासह नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागने यांनी आरोपीला घेतले ताब्यात.
तक्रारदार पुरूष , वय 37 वर्ष, रा. स्नेहलनगर , वर्धा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी लोकसेवक नामे1) सतिष हिरसिंग चव्हाण वय 48 वर्ष पद- औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन वर्धा,रा,लक्ष्मी किराणा स्टोर समोर, वर्धा मुळ पत्ता प्लॉट न 27, भाग्यदय कॉलोनी एम.आय.डी.सी. रोड, अमरावती,जि अमरावती 2) प्रवीण यादवराव पाथरकर, वय 46 वर्ष, रा केळकर वाडी, आर्वी रोड वर्धा खाजगी इसम यांनी तक्रारदार यांची मेडिकल अजेंसी व शॉप चे व्यवसाय असून गैरअर्जदार 1 हे निरीक्षनाकरिता आले असता, निरीक्षनाचा अहवाल तक्रारदार यांचे बाजूने सकारात्मक तयार करणेसाठी 10,000 रुपये ची मागणी करून गैअर्जदार 2 यांच्यावतीने स्वीकारण्याची तयारी दर्शवून ताडजोडीअंती 7,000 रुपये गैरअर्जदार 2 यांनी शासकीय पंचासमक्ष स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले यावरून आलोसे 1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.हि कारवाई.राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर,परिक्षेत्र नागपूर.पर्यवेक्षण अधिकारी वाचक श्रीमती अनामिका मिर्झापुरे, पोलिस उपअधीक्षक नागपुर परीक्षेत्र,नागपूर सापळा व तपासी अधिकारी श्रीमती प्रीती शेंडे, पोलीस निरीक्षक ला. प्र. वी. नागपूर सापळा कार्यवाही पथक श्री सचिन मत्ते, श्री निलेश उरकुडे पोलीस निरीक्षक, पोहवा भरतसिंग ठाकूर नापोशी भागवत वानखेडेमापोशि दीपाली भगत, चालक नापोशी सागर देशमुख सर्व ला. प्र. वी. नागपूर
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24