{ वै.अधिक्षकांचे दूर्लक्ष } रूणालयाचे प्रवेश द्वार देते अपघाताचे निमंत्रण.

0

🔥हेच ते वै.अधिक्षक दूर्लक्ष,देत असून रूणालयाचे प्रवेश द्वार देते अपघाताचे निमंत्रण.

भिडी प्रतिनिधी,राजू वाटाणे -/ वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील भिडी येथील अव्वल असलेल्या रूग्णालयाला गेल्या दोन ते तिन वर्षात अनेक समस्यांच ग्रहण,रिक्त पदांचे ,तंज्ञ डॉ.नाही ,नेत्र विभाग आठवड्यातून एक दिवस तर दंत्त चिकीत्सक हा ही विभाग आता हपत्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय येथिल रूग्णालयाने घेतला असल्याचे रूग्णातून ऐकायला मिळत आहे.

येथील मूख्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक प्रमोद कोडापे हे असून त्यांचे कडे अतिरीक्त कार्यभार पूलगाव ग्रामीण रूग्णालयाचा असल्याने ते आठवड्यातून दोन ते तिन दिवस तेथे घालवितात उर्वरीत दिवस भिडी रूग्णालयाला देतात येथेही ते आपल्या वैद्यकीय कक्षांत बसून राहतात बाह्य रूग्णांनी यात तंज्ञ डॉ.म्हणून तपासणी करण्या करिता त्या कक्षांत प्रवेश केला तर वैद्यकीय अधीक्षक रूग्णांना तेथे डॉक्टर आहे म्हणजे ( प्रसिक्षणार्थी ) डॉ दाखवा असा सल्ला देतात तर रूग्णांची तपासणी स्वत कधिही करीत नाही अशीही ओरड येथे सूरू आहे रूग्णालयाच्या परीसरात अस्वच्छता पसरली आहे येथिल ग्रामिण सामान्य रूग्ण जरी असला त्याला वर्धा -सेवाग्राम (रेफर) हाच सल्ला या रूग्णालयात मिळतो
रूग्णालयात प्रवेश करतांना काही रूग्णाना अपघातास मूकावे लागतात हा रूग्णालयात एक गंभिर प्रश्न असून याकडे रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचे दूर्लक्ष का ?असा ही प्रश्न येथे निर्माण होतो
येथिल ग्रामिण रूग्णालयाच्या मूख्य प्रवेश द्वारा जवळच राष्ट्रीय महामार्गा ची एक पांच ते सहा फूट खोलवर नाली बांधकाम करण्यात आले त्याच नालीवर रूग्णालयाचे प्रेवेश द्वार असून रूग्णालयानी सहा ते सात महीण्या अगोदर द्वार सामोरील नालीवर लोखंडी रॉड व लोखंडी पाईप अॅगल टाकून पूल तयार केला त्यावर सिमेंट नी बांधकाम केले पन ते निकृष्ट दर्जाचे केल्याने त्यावरील सिंमेन्ट पूर्णपने उखडले व नाली वरील लोखंडी ऍंगल,पाईप,राॅड उघडे पडले ते पायदळ चालना-या रूग्णांना वा रूग्णवाहीकेला घातक आहे ही गंभिर बाब असून‌ वैद्यकीय अधीक्षक निद्रा अवस्थेतच का? असा सवाल ग्रामस्त करिता आहे या कडे सबंधित वरीष्ठ अधिका-यांनी तातडीने लक्ष पूरवावे व येथील एक कर्तबगार वैद्यकीय अधीक्षक द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे(क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!