🔥मुस्लिमकब्रस्तानातील सरांक्षण भिंतीचे बांधकाम अर्ध्यावर सोडून कंत्राटदार बेपत्ता.🔥वन्यप्राणी पाण्याच्या शोधात कब्रस्तानात घुसतात,प्रेत बाहेर आल्यावर जबाबदार कोण.
आष्टी शहीद,प्रतिनिधी, (नरेश भार्गव) -/ आष्टी शहरातील मुस्लिम समाजाचे कब्रस्थान हें टेकडीवाले बाबा देवस्थान च्या खालील भागात आहे. या ठिकाणी गेल्या वर्ष भरापासून कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष अता खान यांच्या मागणीवर आमदार सुमित वानखडे यांनी विशेष फंडातून एक कोटी रुपयांची निधी मंजूर केली. त्यापैकी लाखो रुपये निधी खर्च करून शेडचे बांधकाम सुरु आहे. सोबत सरक्षण भिंतीचे बांधकाम अर्धवट सोडून कंत्राट दार बेपत्ता झाल्याची आष्टी शहरात चर्चा आहे.
सविस्तर असे कि,
कोट्याधीश रुपयेचा निधी विविध विकास कामे करण्यासाठी आमदार सुमित वानखडे यांनी मंजूर केला. मंजूर निधीचे बांधकाम अर्धवट करण्यात आले. कबरस्थान ला चारही बाजुने संरक्षणभिंत करिता खड्डे खोडले काही महिन्या नंतर त्या खड्ड्यात सिमेंट काँक्रीट टाकून बुजवीला मात्र कॉलम करिता उभ्या करण्यात आलेल्या लोखंडी सळाखी तश्याच उभ्या आहेत. उभे असलेल्या सरांची वर्षभरापासून पाण्यात असल्यामुळे पूर्ण तः जगा टले आहे .कब्रस्तानात संरक्षण भिंत नसल्याने जंगलातील वन्यप्राणी रोही, डुक्कर पाण्याच्या शोधात या भागात येतात. या भागात आल्यावर रान डुक्कर व जंगली डुकरे हें अंतिम संस्कार करण्यात आलेल्या व्यक्तीचे प्रेत बाहेर काढन्याच्या प्रयत्नात असतात.तसेंच गावातील पाळीव डुक्कर सुद्धा या भागात भटकताना दिसतात. संरक्षण भीतीचे बांधकाम अर्ध्यावर सोडून येथील कंत्राट दार बेपत्ता झाला आहे. येथील बांधकाम निकृष्टदर्जाचे होत असून त्यावर पाणी टाकले जात नाही अशी येथील ग्रामश्याची ओरड होती. बांधकाम संथ गतीने का होत आहे. हें विचारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात गेले तेव्हा अधिकारी सुद्धा दौऱ्याच्या नावाखाली बेपत्ता होते. येथील बांधकाम लवकर व्हावे अशी आष्टी येथील मुस्लिम समाजातील नागरिकांची मागणी आहे. बेपत्ता कंत्राट दाराचे अधिकाऱ्यांनी कान टोचावे व उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागात तील अधिकाऱ्यांना गावात सुरू असलेल्या विकास कामावर लक्ष देण्याचे सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताकीद देण्यात यावी. अशी मागणी आहे.(क्रमशः)