कोटंबा येथील ग्राम पंचायत व जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहातसाजरा. 

0

🔥कोटंबा येथील ग्राम पंचायत व जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहातसाजरा.

सेलु -/ तालुक्यातील कोटंबा ग्राम पंचायत कार्यालयात आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक प्रदीप आंबटकर व ग्राम पंचायत मध्ये प्रशासक प्रफुल्ल नंदनवार यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी माजी सरपंच रेणुका कोटंबकार,ग्रामविकास अधिकारी भगवान कंठाळे ,सामुदायिक विकास अधिकारी वैशाली तीतरे ,शिक्षक राजेश फटिंग, राजेश मने, वृषभ आंबटकर ,आरोग्य सेवक राजू उमाटे, आरोग्य सेविका जयश्री महादुले ,अंगणवाडी सेविका शोभा चीडाम,ज्योत्स्ना तुमडाम,पोलीस पाटील अमोल कुडमथे ,वंदना मस्के, सौ बाजीराव, आशा वैशाली रघाटाटे,गाठे,कर्मचारी अशोक कांबळे, सूरज भोंगाडे ,संगणक चालक सविता सरोकार ईत्यादी मान्यवर, कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची

उपस्थिती होते. यावेळी थॅलेसेमिया ह्या आजारा वर जनजागृती साठी आणि साक्षरते साठी सामूहिक शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत नवीन प्रवेश घेणार्‍या मुलांचे,पालकांचे फुल व मिष्टान्न देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राजेश मने व भगवान कंठाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

         ब्युरो रिपोर्ट साहसिक            News-24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!