सैलानी दर्गा परिसरातून अल्पवयीन मुलीसह संशयित युवक ताब्यात; घनसावंगी पोलिसांकडे सुपूर्द

0

🔥सैलानी दर्गा परिसरातून अल्पवयीन मुलीसह संशयित युवक ताब्यात; घनसावंगी पोलिसांकडे सुपूर्द

रायपूर -/ पोलीस स्टेशन हद्दीतील सैलानी दर्गा परिसरात दिनांक 01/05/2026 रोजी पेट्रोलिंग दरम्यान एक अल्पवयीन मुलगा व अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. सदर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता सुरुवातीस त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही. त्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन रायपूर येथे आणण्यात आले.

सखोल चौकशीअंती सदर मुलगा व मुलगी हे रा. मुंगु जळगाव, ता. घनसावंगी, जि. जालना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत तात्काळ पोलीस स्टेशन घनसावंगी, जि. जालना येथे संपर्क साधून माहिती घेण्यात आली असता भारतीय न्याय संहिता अंतर्गत संबंधित गुन्हा दाखल असल्याचे समजून आले. तसेच संबंधित अल्पवयीन मुलीस एक युवक पळवून घेऊन आल्याची बाब निदर्शनास आली.

यानंतर दोन्ही मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. पुढे पोलीस स्टेशन घनसावंगी येथील पोलीस पथक व संबंधित मुलांचे पालक पोलीस स्टेशन रायपूर येथे दाखल झाल्यानंतर सदर मुलगा व अल्पवयीन मुलगी यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीकरिता घनसावंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाहीबाबत मुलीच्या पालकांनी रायपूर पोलिसांचे आभार व्यक्त केले.

सदर कार्यवाही ठाणेदार निलेश सोळंके यांच्यासह पोहेकॉ कैलास खार्डे, पोकाॅ अनंत कळमकर, पोकाॅ राहुल जाधव, मपोकॉ लक्ष्मी किक्राळे, मपोकॉ अश्विनी मोरे व चालक पोहेकॉ लिंबाजी राठोड यांनी पार पाडली.

तसेच याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतीही अल्पवयीन मुलगी अथवा मुलगा संशयास्पदरीत्या आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन रायपूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

         ब्युरो रिपोर्ट साहसिक        News-/24 रायपूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!