वर्धा शहर ठाण्यातील ते दोन हफ्तेखोर पोलिस कोण ?..शहरात जोरदार चर्चा 

0

🔥वर्धा शहर ठाण्यातील ते दोन हफ्तेखोर पोलिस कोण ?..शहरात जोरदार चर्चा 

🔥विल्सन मोखाडे यांचा सज्जड सवाल 

वर्धा -/ शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्या ऐवजी स्वतः हप्तेखोरी च्या जाळ्यात अडकलेल्या वर्धा शहर ठाण्यातील कार्यरत त्या दोन वादग्रस्त पोलिसांची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.शहरातील दारु विक्री वर कारवाई करण्या ऐवजी शहरातील एक सुध्दा दारु विक्रेता आणि इतर अनधिकृत विक्रेत्याचा विसर न पडता सर्वच ठिकाण च्या दारु विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर जावून हफ्ते गोळा करणाऱ्या खाकी वर्दीतील त्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे गंभीर आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे.वर्धा शहर ठाण्यातील कार्यरत संबंधित त्या दोन्ही वादग्रस्त आणि हफ्तेखोर पोलिस कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील अनेक दारु विक्रेत्यांना आणि इतर अनधिकृत विक्रेत्यांना टार्गेट करुन त्यांच्या कडून पध्दतशीरपणे महिन्याकाठी हफ्ता वसुल केला जात आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांची कसलीही भीती न बाळगता सर्रासपणे सुरु असलेल्या या वसुली ची शहरात खमंग चर्चा सुरु आहे.या प्रकारामुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची ही बदनामी होत असून, त्या दोन्ही हफ्तेखोर पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.शहरातील नागरिक आता त्या दोन्ही हफ्तेखोर पोलिस कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवून त्यांचे चित्रीकरण करुन वरिष्ठांना पाठवणार असल्याचे चर्चेतून समोर आले.शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी असणाराच पोलिस कर्मचारी जेव्हा गुन्हेगारांना पाठीशी घालून हफ्तेखोरीत गुंततो, तेव्हा सर्व सामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास नक्कीच उडतो.सध्या शहरातील अशा त्या दोन्ही वादग्रस्त आणि भ्रष्ट “हफ्तेखोर”पोलिस कर्मचाऱ्यांची सर्वत्र चर्चा ऐकिवात आहे.शहरातील अनेक भागात अनधिकृत दारु विक्रेत्यांकडून आणि जुगार व्यवसायीकांकडून हे दोन्ही पोलिस कर्मचारी हफ्ता गोळा करत आहेत.आणि गुन्हेगारांना कारवाई पासून अभय देत आहेत‌.अशी माहिती समोर येत आहे.एकीकडे सर्व सामान्य नागरिक प्रामाणिकपणे जीवन जगत असतांना, दुसरीकडे वर्दीतीलच व्यक्ती दारु विक्रेत्यांना आणि जुगार व्यवसायीकांना धारेवर न धरता पोसत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.”रक्षकच भक्षक”बनल्याच्या या गंभीर आणि अनुचित प्रकारामुळे शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.आता या हफ्तेखोर पोलिस कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवून यांची अंतर्गत पातळीवर गोपनीय चौकशी सुरु करण्याची आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.वर्धा शहर ठाण्यातील ते दोन हफ्तेखोर पोलीस कर्मचारी कोण? हे पाहणे मात्र, महत्वाचे ठरणार आहे.

(पुढील अंकात नाव जाहीर होणार…. क्रमशः)

           ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!