कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

0

🔥कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न.

🔥खेळाडूंनी आयएएस,आयपीएस अधिकारी बनून देशसेवेचे कार्य केल्यास अधिक प्रभावी ठरेल!पंडीत शंकरप्रसादजी अग्निहोत्री 

वर्धा -/ आजच्या धकाधकीच्या जीवनात कराटे हा खेळ स्वसंरक्षणाचे एक उत्तम साधन तर आहेच सोबतच कराटे खेळाला शासकीय व निमशासकीय भरतीत 5% खेळाडू आरक्षण असल्यामुळे खेळाडूंनी नियमित सराव करून राज्य, राष्ट्रीय पदक प्राप्त करून शासकीय नोकरीचा लाभ घ्यावा.

असे प्रतिपादन पंडीत शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांनी केले ते दिनांक 5 जुलै रोजी, पेंटागॉन हॉल, अग्निहोत्री कॉलेज, रामनगर वर्धा येथे स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वार संलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी विचार व्यक्त करताना बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की,खेळाडूंनीही आपल्या क्रीडा कारकिर्दीसोबतच देशसेवेची नवी वाट निवडावी, बौद्धिक, शारीरिक, मानसिक व आत्मिक बलासह कष्ट, शिस्त, चिकाटी आणि संघभावना या खेळातून मिळालेल्या मूल्यांचा उपयोग राष्ट्रसेवेसाठीही तितक्याच प्रभावीपणे केला जाऊ शकतो,अलीकडेच काही माजी खेळाडूंनी स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवेत, विशेषतः आयपीएससारख्या जबाबदार पदांवर प्रवेश मिळवून एक नवे उदाहरण निर्माण केले आहे. खेळातील सातत्य, मानसिक ताकद आणि अपयशातून पुन्हा उभे राहण्याची वृत्ती ही प्रशासनातही तितकीच उपयुक्त ठरते.

युवा खेळाडूंनी केवळ मैदानापुरते मर्यादित न राहता समाज, सुरक्षा आणि शिस्त या क्षेत्रांतही योगदान द्यावे.

हा या विचारामागचा मुख्य संदेश आहे. देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळे मार्ग उपलब्ध असतात; त्यात खेळाडूंनी आयएएस, आयपीएस, सेवांच्या माध्यमातून पुढे येणे ही अभिमानाची बाब ठरू शकते.

खेळामुळे व्यक्तिमत्त्व घडते, आणि त्या व्यक्तिमत्त्वाचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी झाला, तर तो खरा विजय ठरेल. त्यामुळे खेळाडूंनी ‘फक्त विजेते’ न होता ‘देशसेवक’ही बनावे, हीच काळाची गरज आहे.

        याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीचे संचालक पवन तिजारे, प्रमुख अतिथी म्हणून वर्धा कला महोत्सव चे अध्यक्ष संदीप चिचाटे, महात्मा फुले प्रतिष्ठान वर्धा जिल्ह्याच्या अध्यक्ष रोहिणीताई पाटील, तर प्रमुख उपस्थितीत स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संतोष सेलूकर, उपाध्यक्ष मोहन मोहिते, सहसाचिव हरीश पाटील, सभासद निखिल सातपुते, प्रवीण पेठे, सचिन झाडे, संचालक मंडळातील विश्वसिंधी सेवा संगम चे राष्ट्रीय उपाध्यक्ष भगवानदास आऊजा, माजी असिस्टंट पोलीस कमिशनर गंगाधरजी पाटील, वुशू स्पोर्ट असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत, अभिजीत रघुवंशी, प्रशांत येंडे व इत्यादी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे संस्थापक तथा जिल्हा सचिव शिहान मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनात सावंगी (मेघे) शाखाप्रमुख सेन्साई चेतन जाधव, रामनगर शाखाप्रमुख सेन्साई पूजा गोसटकर, कृष्णा नगर शाखाप्रमुख सेन्साई ऋषभ चावरे, बोरगाव मेघे शाखाप्रमुख सेन्साई रुजान बांगमोरे यांनी केले. संचालन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कलर कोड खेळाडू नीता मोहर्ले यांनी केले तर आभार मान्यताप्राप्त वर्धा जिल्हा कराटे असोसिएशनचे कोषाध्यक्ष सौ मनीषा राऊत यांनी मानले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सेन्साई शुभम राखडे, कार्तिक भगत, सेन्साई तेजस निवल, सुशांत जीवतोडे, भार्गव खेवले, देवांशु लाखे, गायत्री अवसरे, प्रथमेश धाबर्डे, जान्हवी नांदुरकर व स्पोर्ट कराटे असोसिएशनच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत खेळाडू, पालक वर्ग व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

         ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!