🔥ठाणेदार पंकजजी वाघोडे सेलू कडून पोलीस पाटील नम्रता गव्हाळे सन्मानित.
सेलू -/येथे दिनांक 10.07.2026 ला पोलीस स्टेशन सेलू येथे पोलीस पाटील मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते या मिटिंग मध्ये मा. ठाणेदार पंकजजी वाघोडे साहेब यांचे कडून मागील महिन्यात खापरी या गावात दोन भावंडाचा शेतीचा वाद निर्माण झाला होता या कामी आपसी समोपचार घडऊन आणण्याकरिता गावातील पोलीस पाटील नम्रता गव्हाळे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली तसेच शेताच्या बांधावर जाऊन त्यांची आपसी शेताची वाटणी त्यांचे संगणमताने पंचा समकक्ष करून घेतली व कौटुंबिक वादाचे निरसन केले या कामाची नोंद मा. ठाणेदार वाघोडे साहेब यांनी घेऊन त्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित केले तसेच इतर पोलीस पाटील यांनी सुद्धा या प्रमाणे काम करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे कारण पोलीस पाटील हे कायद्याचे कांन नाक आणि डोळे आहे असे संबोधित केले व कार्य करण्यास इतर पोलीस पाटील यांना आवाहन केले या मिटिंगला सर्व पोलिस पाटील बंधू आणि भगिनी हजर होते.